Prajakta Mali: आजकाल अनेक मराठी सेलिब्रेटी लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. त्याचबरोबर काही मराठी सेलिब्रेटी हे अद्यापही सिंगल (Marathi Celebrity Wedding) आहेत तर काही रिलेशनशिपमध्ये आहेत. त्यामुळे सिंगल असणारे मराठी सेलिब्रेटी कधी रिलेशनशिपमध्ये येणार आणि लग्न करणार अशा चर्चाही सुरू व्हायला वेळ लागत नाही. आपले आवडते मराठी कलाकार कधी विवाहबंधनात अडकत आहेत याबद्दल त्यांची उत्सुकता कायम शिगेला असते. जराशी चुणूक जरी आली तरी त्यांच्या रिलेशनशिपच्या (Relationships) चर्चा होयला फार वेळही लागत नाही. सध्या मराठी चित्रपटसृष्टीतील अशाच एका अभिनेत्रीच्या चर्चा रंगल्या आहेत. आपल्या मोहक अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकून घेणारी लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळीही कधी लग्न करणार असा प्रश्न तिच्या चाहत्यांनी कायम पडतो. सध्या तिच्या लग्नाच्या बातम्यांना परत एकदा उधाण आलं आहे यामागेही एक खास कारण आहे. तेव्हा जाणून घेऊया नक्की काय? (prajakta mali wedding predictions by celebrity astrologer anant patwa what he exaclty said)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठी कलाविश्वात प्राजक्ता माळीची क्रेझ तिच्या चाहत्यांमध्ये प्रचंड आहे. जुळून येती रेशीमगाठी (Prajakta Mali Serials) या मालिकेनंतर ती सर्वांचीच लाडकी झाली या मालिकेनंतर तिला खूप प्रसिद्धी मिळाली आणि तिच्या भुमिकेचेही कौतुक केले गेले. प्राजक्ता सोशल मीडियावरही खूप एक्टिव आहे. त्यामुळे तिच्या हरएक पोस्टला तिच्या चाहत्यांकडून वाहवा मिळते. प्राजक्ता कधी लग्न करणार यासाठी ती कायमच तिच्या चाहत्यांमध्ये चर्चेत राहते. तु कधी करणार असा प्रश्न तिचे चाहतेही तिला विचारत असतात. प्राजक्ता कोणासोबत लग्न करणार याची उत्सुकता तर तिच्या चाहत्यांना केव्हापासून लागून राहिली आहे. 


हेही वाचा - Fact Check: अपघातानंतर Rishabh Pant चं सामान, पैसे लोकांनी पळवले? पोलिसांनी सांगितलं सत्य


खरंच 2023 मध्ये आहेत लग्नाचा योग? 


अनंत यांनी सांगितले की, प्राजक्ताचं करिअर हे यशाच्या शिखरावर आहे. येणारं पुढील वर्ष हे प्राजक्तासाठी चांगलं राहील. तिला नवीन प्रोजेक्ट्सही मिळतील. 23 जानेवारीनंतर तिला अनेक गोष्टींचा फायदाही होणार आहे. त्याचबरोबर या तारखेनंतर तिचं वैयक्तिक आयुष्यही चांगलं राहणार आहे. गुरूच्या कृपेनं तिच्या लग्नाचेही योग आहेत. ती कामात व्यस्त असल्यानं ती तिचे लग्नाचे प्लॅन्स पुढेही ढकलू शकते.  


प्राजक्ताची नुुकतीच रानबाजार ही सिरिज प्रसिद्ध झाली होती. यातील बोल्ड लुकमुळे तिची चर्चाही खूप झाली आहे त्याचबरोबर तिच्यावर टीकाही झाली. परंतु अनेक मुलाखतीतून तिनं या भुमिकेमागील कारणंही स्पष्ट केले आहे. चंद्रमुखी या सुपरहीट चित्रपटातही ती दिसली होती. महाराष्ट्राची हास्यजत्रामुळे (Maharashtrachi Hasyajatra) ती घराघरात पोहचली आहे.