मुंबई : अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. प्राजक्ता नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन प्राजक्ता चर्चेत येण्याची कोणतीही संधी मागे सोडत नाही. आपल्या जबरदस्त अभिनयाने चाहत्यांना घायाळ करणारी प्राजक्ता माळीने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करुन खळबळ माजवली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री प्राजक्ता माळी सतत आपल्या कामामुळे आणि लूक्समुळे चर्चेत असते. आजही अभिनेत्रीने आपले हटके फोटो शेअर करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे. प्राजक्ता माळीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकतंच आपले फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताच ते व्हायरल होत आहेत.



या फोटोंमध्ये ती काळया रंगाच्या साडीत फारच सुंदर दिसत आहे. अभिनेत्रीचा हा इंडोवेस्टर्न लूक सर्वांना घायाळ करत आहे. शिवाय अभिनेत्रीने फोटो शेअर करत 'वसंतसेना' असं कॅप्शन दिलं आहे. प्राजक्ताच्या या फोटोंवर चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंट्स वर्षाव पहायला मिळत आहे. नुकतंच प्राजक्ता 'रानबाजार'मुळे चर्चेत आली होती.