Prakash Raj Tweet On Hindi Language : दाक्षिणात्य अभिनेता प्रकाश राज (Prakash Raj) हे नेहमीच चर्चेत असलेल्या कलाकारांपैकी एक आहेत. ते स्पष्टपणे त्यांच मत मांडताना दिसतात. वादग्रस्त कलाकारांच्या यादीत त्याचंही नाव हे आहे. दरम्यान, प्रकाश राज यांनी तीन वर्षांपूर्वी केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टवरून एक वाद सुरु झाला आहे. सुप्रीम कोर्टाचे वकील शशांक झा यांनी सोशल मीडियावर प्रकाश राज यांची तीन वर्षे जूनी पोस्ट शेअर करत तामिळनाडू पोलिसांना टॅग करत त्यांनी प्रकाश राज यांच्या विरोधात तक्रार दाखल केली का असा प्रश्न केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शशांक झा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून प्रकाश राज यांच्या या ट्वीटचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. शशांक यांनी शेअर केलेल्या या पोस्टमध्ये प्रकाश राज यांनी काळ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केला आहे. या टी-शर्टवर कन्नड भाषेत लिहिलं आहे की, 'मला हिंदी समजत नाही, जा!' त्यावर आता मोठा वाद सुरु झाला आहे. सोशल मीडियावर अनेकांनी प्रकाश राज यांचा विरोध केला आहे. तर कर्नाटकच्या काही लोकांनी मात्र, प्रकाश राज यांचे समर्थन केले आहे. (Prakash Raj Tweet on Kannada Language) 



दरम्यान, त्यावर आता प्रकाश राज यांनी उत्तर दिले आहे. 'माझं सगळं काही आणि माझी भाषा ही कन्नड आहे. जर तुम्ही तिचा अपमान करण्याचा प्रयत्न कराल आणि तुमची भाषा लादण्याचा प्रयत्न कराल, तर आम्ही अशा प्रकारेच विरोध करू. तुम्ही आम्हाला धमकी देत आहात का?' फक्त विचारतोय!


हेही वाचा : Tu Jhoothi Mein Makkar Collection: तू झूठी मै मक्कार..ने पहिल्याच दिवशी केली तुफान कमाई



कसं सुरु झालं हे प्रकरण? 


हे संपूर्ण प्रकरण 2020 साली बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये सुरु झालेल्या वादामुळे झाला. भाषेवरून लोक एकमेकांवर कमेंट करत होते. या दरम्यान, 13 सप्टेंबर 2020 रोजी हिंदी दिवसाच्या निमित्तानं प्रकाश राज यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली होती. याचवेळी त्यांनी हे काळ्या रंगाचं टी-शर्ट परिधान केलं होतं. हा फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शन दिलं होतं की 'मला अनेक भाषा येतात. मी अनेक भाषांमध्ये कामही करू शकतो. पण माझी शिकवण, माझी धोरणं, माझं सर्वकाही, माझा गौरव, माझी मातृभाषा ही कन्नड आहे.'