Tu Jhoothi Mein Makkar Collection: तू झूठी मै मक्कार..ने पहिल्याच दिवशी केली तुफान कमाई

Ranbir Kapoor आणि Shraddha Kapoor च्या या चित्रपटानं पहिल्याच दिवशी इतकी कमाई करत सगळ्यांना आश्चर्यात पाडले आहे. पठाणनं नंतर बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी इतकी कमाई करणारा हा पहिला चित्रपट ठरला आहे. Tu Jhoothi Mein Makkar या चित्रपटाच्या ट्रेलरनंच प्रेक्षकांना वेड लावलं होतं. 

Updated: Mar 9, 2023, 05:03 PM IST
Tu Jhoothi Mein Makkar Collection: तू झूठी मै मक्कार..ने पहिल्याच दिवशी केली तुफान कमाई title=

Tu Jhoothi Mein Makkar Box Office Collection Day 1 : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) यांचा 'तू झूठी मैं मक्कार' (Tu Jhoothi Mein Makkar) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. चित्रपटाचा ट्रेलर जेव्हा प्रदर्शित झाला होता. तेव्हा पासून प्रेक्षकांना या चित्रपटाची आतुरता लागली होती. श्रद्धा आणि रणबीरचा हा चित्रपट 8 मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच त्याची अॅडव्हान्स बुकिंग मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती. होळीच्या निमित्तानं हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातून रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर पहिल्यांदा एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. या दोघांना एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर असताना. चित्रपटानं पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. 'पठाण' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर बक्कल कमाई केली. त्यानंतर 'तू झूठी मैं मक्कार' बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी तुफान कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे. 

'तू झूठी मैं मक्कार' या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनविषयी चित्रपट समिक्षक तरण आदर्श यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत  चित्रपटानं पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली याचा खुलासा केला आहे. सणाच्या दिवशी चित्रपट प्रदर्शित झाल्यानं त्याला फायद्या झाल्याचे म्हटले जात आहे. चित्रपटानं पहिल्याच दिवशी15.73 कोटींचा गल्ला केला. आताचे नंबर पाहता हा लवकरच वाढेल अशी अनेकांची आशा आहे. रणबीर आणि श्रद्धाच्या या चित्रपटाला समिक्षकांनी चांगली पसंती दिली आहे. 

हेही वाचा : ...तरच तुमचं लग्न शेवटपर्यंत टिकतं; लग्नाच्या 19 वर्षांनंतर 'या' लोकप्रिय Actress नं घेतला Divorce

श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूर यांचा हा चित्रपट रॉम-कॉम असल्याचे म्हटले जात आहे. चित्रपटात फक्त रोमान्स आणि कॉमेडी नाही तर त्यासोबत अॅक्शन देखील पाहायला मिळत आहेत. चित्रपटगृहात अनेक चाहते हे चित्रपट पाहताना त्या क्षणात जगत होते असे अनेकांना फील झाले. श्रद्धा कपूर जवळपास 2 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर दिसत आहे. त्यामुळे दोन वर्षांनंतर श्रद्धा मोठ्या पडद्यावर कशी कामगिरी करणार याकडे सगळ्यांचे लक्ष होते. 'तू झूठी मैं मक्कार' या चित्रपटाचे दिग्दर्शन लव रंजन यांनी केले आहे. तर या चित्रपटाची निर्मिती ही 95 कोटींमध्ये करण्यात आली आहे.