मुंबई : बॉलिवूडमध्ये एखादा कलाकार गाजला नाही तरी मात्र त्याची लव्हस्टोरी तुफान चर्चेत राहते. प्रत्येक चाहत्याला त्याच्या आवडत्या कलाकाराच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता मनात शिगेला पोहोचलेली असते. दाक्षिणात्य सिनेसृष्टीच्या माध्यमातून आपल्या करियरची सुरूवात करणारा अभिनेता प्रकाश राजचा आज वाढदिवस आहे. प्रकाशने कधी खलनायकाची भुमिका साकारत चाहत्यांना घाबरलं तर कधी विनोदबुद्धीने प्रेक्षकांना हासण्यास भाग पाडलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'सिंघम', 'वॉन्डेड' या सिनेमांमुळे त्याच्या करियरला चांगलीचं कलाटणी मिळाली. महत्त्वाचं म्हणजे प्रकाश राजने त्याच्यापेक्षा 12 वर्ष लाहान तरूणीसोबत लग्न केलं.  प्रकाशच्या पत्नीचं नाव पोनी वर्मा असं आहे. प्रकाश आणि पोनीने 2010 साली लग्न केलं. त्यानंतर  वयाच्या 50व्या वर्षी तो बाबा झाला. 



पोनी कोरियोग्राफर आहे. तिने 'द डर्टी पिक्चर' सिनेमाचं उलाला उलाला हे गाणं कोरियोग्राफ केलं . पोनी ही प्रकाशची  दुसरी पत्नी आहे. त्याचं पहिलं लग्न 1994 साली अभिनेत्री ललिता कुमारसोबत लग्न केलं. पण ते 2009 साली कायमचे विभक्त झालेय 


प्रकाशने करियरच्या सुरवातीच्या काळात फार संघर्ष केला. फक्त 300 रूपये महिन्यावर काम करत होता. पण आताच्या घडीला तो एक प्रसिद्ध अभिनेता आहे. प्रकाशने रंगमंचावर देखील काम केलं आहे. प्रकाशने मराठी, हिंदी, कन्नड सिनेमांमध्ये देखील भुमिका साकारली आहे.


प्रकाश राज यांनी 1994 साली 'Duet'सिनेमाच्या माध्यमातून  तामिळ सिनेसृष्टीत पदार्पण केलं. तेव्हा दिग्दर्शकाच्या सांगण्यावरून प्रकाशने स्वतःचं आडनावं बदललं. आधी त्यांचं नाव प्रकाश राय होतं. आता त्याने नाव बलल्यामुळे प्रकाश राज म्हणून चाहते त्याला ओळखतात.