Swapnil Joshi and Prarthana Behere : स्वप्नील जोशी आणि प्रार्थना बेहेरे यांची अनेकदा चर्चा रंगलेली असते. त्यामुळे ते चांगलेच ट्रेण्डमध्ये असतात. काही वर्षांपुर्वी त्यांचा 'मितवा' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यांच्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी तूफान प्रतिसाद दिला होता. आज याच चित्रपटाची तुम्हाला पुन्हा आठवण आल्याशिवाय राहणार नाही. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे ज्यात स्वप्नील जोशी आणि प्रार्थना बेहेरे यांचा एक कमाल व्हिडीओ चर्चेत आहे. स्वप्नील आणि प्रार्थना हे दोघंही सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय आहेत. त्यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली असते. यावेळी त्यांनी एक व्हिडीओ हा शेअर केला आहे. त्यांनी यावेळी 'कवाला' या गाण्यावर डान्स केला आहे. त्यांच्या या व्हिडीओखाली नेटकऱ्यांच्या तूफान कमेंट्स येताना दिसत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी प्रार्थनानं पंजाबी ड्रेस परिधान केला आहे. तर स्वप्नीलनं शर्ट आणि पॅण्ड घातली आहे. तो तिच्या मागे राहून या गाण्याची हुकअप स्टेप करताना दिसतो आहे. यावेळी डान्स करता करता स्वप्नीलचा हात हा प्रार्थनाच्या डोक्याला जोरात लागतो. मग ती नाचायची थांबते पण यावेळी स्वप्नीलला मात्र हसू आवरता येत नाही. त्याला पाहून स्वप्नील ती पाठीत खोटी खोटी लाथ मारते. सध्या त्यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या नानाविध प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. सगळ्यांनी त्यांच्या या व्हिडीओ चांगला प्रतिसाद दिला आहे. चाहते त्यांच्या या व्हिडीओवर तूफान हसताना दिसत आहेत. प्रार्थना आणि स्वप्नीलनंही हा व्हिडीओ एन्जॉय केला आहे. सध्या ते आपल्या एका चित्रपटाचे शुटिंग करत आहेत.


'मितवा' या चित्रपटानंतर स्वप्नील जोशी आणि प्रार्थना बेहेरे हे दोघं पुन्हा एकदा नव्या चित्रपटातून दिसणार आहेत. त्यामुळे ते लंडनला शुटिंगसाठी गेले आहेत. 2015 नंतर ते दोघं एकत्र एका चित्रपटातून दिसत आहेत. यावेळी त्यांच्या व्हिडीओला चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. अमृता खानविलकर, पुष्कर जोग, अभिज्ञा भावे, अभिनय बेर्डे, आकाश टांकसाळे, अभिनय बेर्डे, मेघना एरंडे यांनी यावेळी या व्हिडीओखाली नानाविध कमेंट्सही केल्या आहेत. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


सध्या त्यांच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांनीही तूफान प्रतिसादही दिला आहे. अनेकांनी यावेळी म्हटलं आहे की, मितवा 2 येयला पाहिजे. तर काहींनी म्हटलंय की, ''Sir plz एकदा तुमच्या नाकातून रक्त काढून दाखवा'', ''तू ही रे..2 साठी माझ्या कडे स्टोरी आहे'', ''काय राव दिली न तिने शेवटी'', अशा कमेंट्सही नेटकरी करताना दिसत आहेत.