Prasad Oak Birthday: प्रसिद्ध अभिनेता- दिग्दर्शक प्रसाद ओक याचा आज वाढदिवस आहे. प्रसादच्या वाढदिवसानिमित्त त्याची पत्नी मंजिरी ओक हिने एक पोस्ट शेअर करत प्रसादला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मंजिरीच्या या पोस्टवर प्रसादनेही कमेंट केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेता प्रसाद ओक याचा आज 17 फेब्रुवारी रोजी वाढदिवस असतो. सोशल मीडियावर त्याच्या चाहत्याकडून व मित्र परिवाराकडून त्याला शुभेच्छा दिल्या जात आहेत. मंजिरीनेही त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण एक हटके पोस्ट करत. मंजिरीने केलेल्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. 


मंजिरी ओकने प्रसादसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. तसंच, भन्नाट कॅप्शन लिहित त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने लिहलं आहे की, प्रसाद साद फोटोत तोंड बंद आहे म्हणून तुला वाटत असेल की ,मी अशी वागेन , गप्प बसेन , तुला बोलू देईन ,मी फक्त ऐकेन तर जागा हो . फोटो आहे तो , मी फक्त फोटो मधेच गप्प बसू शकते …तुला पर्याय नाही. Oh sry sry आज चांगलं बोलायचं असतं ना ? okok स्वामी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करो. Happyyyyyy birthday. 


प्रसादने ही मंजिरीच्या पोस्टवर लव्ह यू असं म्हणत एकाप्रकारे तिला थँक्यू म्हटलं आहे. तर, मंजिरीच्या पोस्टवरच अनेकांनी त्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. मंजिरीची ही हटके पोस्ट सर्वांना आवडली आहे. अभिनेता प्रसाद ओकने आत्तापर्यंत अनेक चित्रपटात काम केले आहे. मात्र, आता तो दिर्गदर्शक म्हणूनही आपली नवीन ओळख निर्माण करत आहे.



प्रसाद ओकने हिरकणी, चंद्रमुखी यासारख्या सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे. तसंच, अलीकडे त्याने धर्मवीर, मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटात धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती. ही त्यांची भूमिका चांगलीच गाजली होती. याच चित्रपटाचा पुढील भागही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार आहे. 


दरम्यान, मंजिरी आणि प्रसाद ओक यांनी अलीकडेच त्यांच्या नवीन घराचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यावेळी त्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी एक पोस्टही शेअर केली होती. त्याने लिहलं होतं की, माझ्यासारख्या एका छोट्या कलाकाराच्या विनंतीला मान देवून तुम्ही दिलेला शब्द पाळलात आणि वास्तू शांतीच्या दिवशी आमच्या घरी आलात. अत्यंत व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून आलात. कोणताही राजकारणी अविर्भाव न ठेवता अगदी कुटुंबातलेच असल्याप्रमाणे आमच्या सोबत बसलात,जेवलात.. नीट निरखून आख्खं घर पाहिलंत. हा प्रसंग आमच्या सगळ्यांच्या मनावर कायमचा कोरला गेला आहे. आपले गुरु धर्मवीर आनंद दिघे साहेब, यांच्या पावलावर पाऊल टाकत आपण ज्या पद्धतीनी “माणूस” जोडता आहात ते पाहता “गुरुने दिला ज्ञानरुपी वसा…आम्ही चालवू हा पुढे वारसा” हे शब्द तंतोतंत खरे करताय असंच वाटलं..!!