Video : बराक ओबामांवर `या; भारतीय गायकाची भुरळ; त्यानं पुणेकरांना असं पाडलं प्रेमात
तरुणाईच्या आणि खुद्द अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा (US Former President Barack Obama) यांच्या काळजाचा ठाव घेणारा हा गायक म्हणजे...
Concert Viral Video : 'साँसे मेरी अब बेफिकर है.....' (Saanse meri ab befikar hai) असं म्हणत तो व्यासपीठावर आला आणि समोर हजारोंच्या संख्येनं उभ्या असणाऱ्या श्रोत्यांनी एकच कल्ला करण्य़ास सुरुवात केली. त्यानं गाणं म्हणण्यास सुरुवात केली तेव्हा प्रत्येकजण त्याच्या सुरात सूर मिसळू लागला होता. काहींना त्यांच्या प्रेमाचं माणूस आठवलं होतं, काहींना त्याची किंवा तिची साथ नसल्याचं दु:ख सतावत होतं. एका गायकाच्या आवाजानं आणि त्यांच्या शब्दांमुळं हे सर्व साध्य होत होतं. तरुणाईच्या आणि खुद्द अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा (US Former President Barack Obama) यांच्या काळजाचा ठाव घेणारा हा गायक म्हणजे प्रतीक कुहड (Prateek Kuhad). (prateek kuhads song impressed barack obama made another magical move in pune and mumbai Concert )
गेल्या काही वर्षांमध्ये लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेला प्रतीक (who is prateek kuhad?) सध्या तरुणाईच्या गळ्यातलं ताईत. प्रेम व्यक्त करणं असो किंवा विरहात एखाद्याच्या नसण्यातही त्या व्यक्तीचं अस्तित्वं शोधणं असो, प्रतीकचे शब्द आणि त्याचा आवाज सगळ्या भावना अगदी सोप्या पद्धतीनं व्यक्त करतो (Prateek Kuhad Songs).
नुकताच त्याचा एक लाईव्ह कॉन्सर्ट मुंबई (Prateek Kuhad Concert in mumbai) आणि पुण्यात (prateek Kuhad Concert in pune) पार पडला, जिथे त्यानं अपेक्षेप्रमाणं श्रोत्यांच्या काळजाचा ठाव घेतला. पुणेकरांसमोर तो गायला उभा राहिला आणि अनेकांच्याच चेहऱ्यावर निखळ हास्य पाहायला मिळाले. आपण काहीतरी वेगळं अनुभवतोय याचीच जाणीव प्रत्येकाच्या हावभावांवरून स्पष्ट दिसत होती. प्रतीकनं त्याच्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवरून शेअर केलेले काही व्हिडीओ पाहताना याचा अगदी सहज अंदाज लावता येत आहे.
ओबामांनी जेव्हा प्रतीकच्या गाण्याला आपलं Favorite म्हटलं....
2019 मध्ये प्रतीक त्याच्या घरी बसला होता तेव्हाच त्याला हजारोंच्या संख्येनं मेसेज येऊ लागले. त्या वर्षातील आपल्या सर्वात आवडत्या गाण्यांची यादी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी जाहीर केली होती. त्या यादीत प्रतीकच्य़ा Cold Mess या गाण्याचाही समावेश होता.
प्रतीकसाठी हे अगदीच अनपेक्षित आणि एक वेगळीच उर्जा देणारं होतं. 2016 मध्ये पहिल्यांदाच हे गाणं प्रदर्शित झालं होतं. यामध्ये कुठेच बॉलिवूडचा टच नव्हता, उडती चालही नव्हती. हो, पण गाण्याच्या भावना मात्र काळजाला भिडणाऱ्या होत्या. प्रेमात असणाऱ्या एका जोडीचं नातं अशा वळणावर येतं, जिथं त्यांना एकमेकांपासून दूर राहणंही शक्य होत नाही त्या वेळी असणाऱ्या भावनांचा कोलाहल त्यानं या गाण्यातून मांडला होता.
अनेक आंतरराष्ट्रीय गायकांमध्येच खुद्द ओबामांनी प्रतीकच्या गाण्याला दिलेली पसंती त्याच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरली. ''I wish I could leave you, my love, but my heart is a mess", "My days they begin with your name, and nights end with your breath" असे शब्द असणारं गाणं कोणालाही वेड लावेल नाही?