मुंबई : बॉलिवूड अभिनेता प्रतिक बब्बर आणि सान्या सागर लग्नबंधनात अडकले. लग्नानंतर दोघांच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत झाले होते. नुकत्याच झालेल्या 'व्हॅलेंटाइन डे'च्या निमित्ताने प्रतिक बब्बरने त्याच्या पत्नीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर केल्यानंतर प्रतिक आणि सान्या या दोघांनाही सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल करण्यात येत आहे. नेटकऱ्यांनी ट्रोल केल्यानंतर प्रतिकने सोशल मीडियावरून हा फोटो डिलीट केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'व्हॅलेंटाइन डे'ला प्रतिकने त्याचा आणि सान्याचा टॉपलेस फोटो सोशल मीडियावर शेअर केला. इन्स्टाग्रामवरून हा फोटो शेअर केल्यानंतर या फोटोवर नेटकऱ्यांकडून चांगलीच टीका करण्यात येत आहे. नेटकऱ्यांनी प्रतिक आणि सान्याला ट्रोल करत चांगलंच धारेवर धरलं आहे. या फोटोत सान्या आणि प्रतिक सेल्फी सेल्फी काढताना दिसत आहेत. या फोटोमुळे या जोडीला नेटकऱ्यांनी चांगलंच धारेवर धरलं होतं. त्यानंतर प्रतिकने हा फोटो डिलीट केला आहे. 





अभिनेता प्रतिक बब्बर प्रतिक बसपा नेते पवन सागर यांची मुलगी सान्या सागर हिच्यासोबत विवाहबंधनात अडकला. प्रतिक आणि सान्या यांनी लखनऊमध्ये विवाहसोहळा आयोजित करण्यात आला होता. प्रतिक - सान्या गेल्या आठ वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. २२ जानेवारी २०१८ मध्ये दोघांनी गोव्यात साखरपुडा केला होता.