प्रतिक बब्बरचं आई स्मिता पाटीलला पुण्यतिथीनिमित्ताने अतिशय भावनिक पत्र
राज बब्बर आणि स्मिता पाटील (Smita Patil)यांचा मुलगा प्रतीक बब्बर (Prateik Babbar)याला नेहमीच आपल्या आईची आठवण येत असते. प्रतीक नेहमीच सोशल मीडियावर
मुंबई : राज बब्बर आणि स्मिता पाटील (Smita Patil)यांचा मुलगा प्रतीक बब्बर (Prateik Babbar)याला नेहमीच आपल्या आईची आठवण येत असते. प्रतीक नेहमीच सोशल मीडियावर काही ना काही शेअर करत असतो. १३ डिसेंबर रोजी स्मिता पाटील हिच्या पुण्यतिथीच्या दिवशी देखील प्रतीकने सोशल मीडियावर आपल्या आईविषयी अतिशय भावनिक नोट लिहून सोशल मीडियावर शेअर केली, या लिखाणाला चाहत्यांनी खूप प्रतिसाद दिला. अभिनेता प्रतीक बब्बरने आपल्या आईला श्रद्धांजली देताना सांगितलं की, आई तू माझ्यात नेहमीच जिवंत राहणार आहे.
प्रतिक बब्बरने आपल्या आईसाठी नेमकं काय लिहिलं?
लोकप्रिय अभिनेत्री स्मिता पाटील (Smita Patil) चा एक मोनोक्रोम फोटो शेअर केला आहे , '३४ वर्षापूर्वी याच दिवशी माझी आई आम्हाला सोडून गेली होती. एवढ्या दिवसात मी तिला माझ्या मनात, हृदयात इमॅजिन करत होतो. आईचा एक परफेक्ट फोटो बनवण्याचा प्रयत्न करत होतो.
आम्ही लोक एका जागी आलो आहोत, एक अतिशय किमती जागेवर. आता ती एक पर्फेक्ट आई आहे. एक पर्फेक्ट महिला...एक पर्फेक्ट रोलमॉडेल... प्रत्येक लहान मुलासाठी प्रिय...अशी पर्फेक्ट आई जिच्या बद्दल प्रत्येक लहान मुलगा विचार करतो, तिच्यासारखा बनू इच्छितो. अशी आई जी तुम्हाला कधीच एकट सोडून जात नाही. तसेच आतापर्यंत तिची साथ आपल्याला लाभते.
प्रतीक बब्बरची आईला श्रद्धाजली
प्रतीक बब्बर (Prateik Babbar)ने पुढे लिहिलं आहे, 'आणि प्रत्येक वर्षी ती माझ्यासोबत तरुण होत आहे... आता ती ६५ वर्षांची तरुणी आहे...ती आपल्यासोबत जगत राहणार, माझ्या आत अनंत समय आणि त्याही पुढे...माझी सुंदर आई माझ्यासाठी सर्वात महत्वपूर्ण, माझी सुपरस्टार लेजेंड.'
स्मिता पाटील यांनी राज बब्बरसोबत लग्न केलं होतं...
अभिनेत्री स्मिता पाटील (Smita Patil) ने अभिनेता राज बब्बर (Raj Babbar) सोबत लग्न केलं होतं. 13 डिसेंबर 1986 रोजी वयाच्या ३१ व्या वर्षी त्यांचं निधन झालं.
स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर त्यांचे १० पेक्षा अधिक चित्रपट रिलीज झाले. स्मिता पाटील यांना अभिनयाच्या बळावर २ नॅशनल अवॉर्ड आणि इतर अवॉर्डस देखील मिळाले. स्मिता पाटिल (Smita Patil) यांच्या मृत्यूच्या एका वर्षाआधी त्यांना 1985 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं होतं.