प्रतिस्पर्धी ते जीवनसाथी; मोदक आणि मॉनिटर अडकले लग्नबंधनात
काही दिवसांपुर्वी सारेगमप लिटिल चॅम्प्स फेम लिटिल मॉनिटर मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लगाटे यांनी आमचं ठरलंय हा हॅशटॅग वापरत आपल्या प्रेमाची कबुली दिली. सोशल मीडियावर प्रेमाची कबूली दिल्यानंतर त्यांचा चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. आता ही जोडी लग्नबंधनात अडकली असून यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या लग्नाला रोहित आणि जुईलीनेदेखील हजेरी लावली होती. या दोघांनी त्यांच्या सोशल मीडियावर या नव्या जोडीचे फोटो शेअर केले आहेत.
मुंबई : काही दिवसांपुर्वी सारेगमप लिटिल चॅम्प्स फेम लिटिल मॉनिटर मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लगाटे यांनी आमचं ठरलंय हा हॅशटॅग वापरत आपल्या प्रेमाची कबुली दिली. सोशल मीडियावर प्रेमाची कबूली दिल्यानंतर त्यांचा चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. आता ही जोडी लग्नबंधनात अडकली असून यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या लग्नाला रोहित आणि जुईलीनेदेखील हजेरी लावली होती. या दोघांनी त्यांच्या सोशल मीडियावर या नव्या जोडीचे फोटो शेअर केले आहेत.
सा रे ग म प लिटील चॅम्प्स (Sa Re Ga Ma Pa Marathi L'il Champs) या रिअॅलिटी शोचं पहिलं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं आणि संपूर्ण महाराष्ट्राला या लहानग्या गायकांनी वेड लावलं. आज या कार्यक्रमाला इतकी वर्षे उलटूनही या लिटील चॅम्प्सची लोकप्रियता कमी झालेली नाही. तोच मोदक, मॉनिटर जेव्हाजेव्हा समोर येतात तेव्हातेव्हा सर्वांनाच जुने दिवस आठवतात. बरं, आता हे लिटिल चॅम्प्स मोठे झालेयत. त्यातल्या काहींनी तर लग्नही केलीयत. कार्तिकी गायकवाडनं काही वर्षांपूर्वी लग्नगाठ बांधली तर, रोहित राऊतही मागच्या वर्षी विवाहबंधनात अडकला. सोशल मीडियावर सक्रिय असणारी याच लिटील चॅम्प्समधील एक जोडी आता एकमेकांचे आयुष्यभराचे सोबती झाले आहेत.
हा लग्नसोहळा कोकणात परा पडला आहे. या शाही विवाह सोबळ्यात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. मुग्धा आणि प्रथमेशने मराठमोळ्या अंदाजात लग्नगाठ बांधली आहे. पिवळ्या रंगाची नऊवारी त्यावर हिरवा एम्ब्रोडरी ब्लाऊज आणि हेव्ही मेकअप आणि केसांचा अंबोडा असा मुग्धाचा संपुर्ण लूक आहे. तर प्रथमेशही मराठमोळ्या पेशवाई लूकमध्ये खुलून दिसत आहे. याचबरोबर त्याच्या गळ्यात कमळाचे हार दिसत आहे. ज्यामुळे त्यांचा हा लूक अजून खुलून दिसत आहेत.
गेले अनेक दिवस चाहते या जोडीच्या लग्नाची वाट पाहत होते. त्यांच्या लग्नाचे फोटो अद्याप त्यांनी त्याच्या सोशल मीडिया अकाऊंन्टवरुन शेअर केले नाहीयेत. त्यांच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी चाहते सध्या कमालीचे उत्सुक दिसत आहेत. हे समोर येतास तुफान व्हायरल होत आहेत.