Prathamesh Parab and Kshitija Ghosalkar Wedding Date : गेल्या अनेक दिवसांपासून मराठी चित्रपटसृष्टीत लगीनघाई सुरु आहे. अनेक सेलिब्रिटी हे लग्नाचे फोटो शेअर करत आहेत. तर कोणी लग्न बंधनात अडकणार आहेत. त्यातील एक कलाकार म्हणजे ‘टाईमपास’ फेम प्रथमेष परब आहे. गेल्या वर्षी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रथमेशनं प्रेमाची कबुली दिली. आता या व्हॅलेंटाईन डे आणि त्या वीकमध्ये त्यांच्या लग्न सोहळ्याचा कार्यक्रम सुरु असणार आहे. त्याविषयी प्रथमेष परबनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत लग्नाची तारिखचा सांगितली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रथमेशनं आणि क्षितिजानं त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्यांच्या लग्नाची पत्रिका शेअर केली आहे. 14 फेब्रुवारी रोजी म्हणजेच व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं त्यांचा साखरपुडा होणार आहे. तर त्याच्या बरोबर 10 दिवसांनी म्हणजेच 24 फेब्रुवारी रोजी त्याचं लग्न आहे. त्यांच्या लग्नाची तारखेचा अखेर प्रथमेश आणि क्षितिजानं त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. लग्नाची पत्रिका शेअर करत क्षितिजानं कॅप्शन लग्नाच्या तारखेची बेरीज केली आहे. त्यातून सगळ्याचं उत्तर हे आठ येत असल्याचं पाहायला मिळालं. आठ या आकड्याचा अर्थ इन्फिनिटी आहे. इन्फिनिटी म्हणजेच अर्थात अनंत काळासाठी असा होतो. पुढे क्षितिजा म्हणाली 'अनंत कायम आहे, आणि तेच माझ्यासाठी तू आहेस, तूच माझा सदैव आहेस.' 



क्षितिजानं सोशल मीडियावर शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा. दुसरा नेटकरी म्हणाला, तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा आणि मी तर वाट पाहत होते की कधी लग्न होतंय तुझं... मी तुझी फॅन आहे. तिसरा नेटकरी म्हणाला, शुभेच्छा दगडु भाऊ, लव्ह यू भावा. आणखी एक नेटकरी म्हणाला, येणार हां लग्नाला. अभिनंदन भाऊस. फक्त चाहते नाही तर अनेक सेलिब्रिटी देखील त्यांना शुभेच्छा देत आहेत. 


हेही वाचा : सलमान खान शब्दाचा पक्का! 9 वर्षांच्या कॅन्सर पीडित मुलाची भाईजाननं घेतली भेट


दरम्यान, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रथमेशनं एक पोस्ट शेअर करत लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर त्या दोघांच्या केळवणाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. आता एका महिन्यात ते लग्न बंधनात अडकणार आहेत.