पत्नी असावी तर अशी! समुद्रकिनारी नवऱ्यासाठी कॅन्डललाईट डिनर; प्रवीण तरडेंच्या बायकोचा रोमॅण्टिक अंदाज
Pravin Tarde Candle Light Dinner With Wife: आपल्या बायकोला खुश करण्यासाठी किंवा आपल्या पतीला खुश करण्यासाठी आपण कायमच काही ना काही प्रयत्न करताना दिसतो. सध्या प्रवीण तरडे आणि त्यांची पत्नी स्नेहल तरडे यांचा रोमॅण्टिक व्हिडीओ हा व्हायरल झाला आहे.
Pravin Tarde Candle Light Dinner With Wife: लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण आपल्या पार्टनरला खूश करण्यासाठी अनेक फंडे शोधून काढत असतो. सध्या अशाच एका मराठमोळ्या कपलची चर्चा आहे. यावेळी त्यांच्या रोमॅण्टिक कॅन्डल लाईट डीनरची चर्चा आहे. अभिनेता - दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्यासाठी त्यांच्या पत्नीनं त्यांना खास रोमॅण्टिक डीनर दिलं आहे. यावेळी समुद्रकिनारी बीचवर प्रवीण तरडे यांना पत्नी स्नेहल तरडे यांनी लग्नाच्या वाढनिमित्त कॅन्डल लाईट डिनर दिलं आहे. यावेळी त्या दोघांचा हा रोमॅण्टिक अंदाज पाहून चाहत्यांनाही कौतुकाचा वर्षाव केला आहे.
नुकताच प्रवीण तरडे आणि स्नेहल तरडे यांनी आपल्या लग्नाचा 14 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी स्नेहल तरडे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत स्नेहल तरडे यांनी प्रवीण तरडेंसाठी बीचवर डिनरचे आयोजन केले होते. दिव्यांची रोषणाई, सुंदर फुलांफुलांची सजावट असलेल्या तंबूत ते दोघंही डिनर करताना दिसत आहेत. यावेळी आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आपल्या बायकोला महागडी रिंग भेट म्हणून दिली. सध्या हा क्यूट आणि रोमॅण्टिक व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होताना दिसतो आहे.
कशी जुळली लव्हस्टोरी?
प्रवीण तरडे हे सुप्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक आहेत. 'धर्मवीर' हा त्यांचा चित्रपटही बराच गाजला. आता या चित्रपटाचा दुसरा भाग हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यांचा 'मुळशी पॅटर्न' हा चित्रपटही प्रचंड गाजला. त्याचा हिंदी रिमेकही प्रेक्षकांच्या भेटीला आला. स्नेहल आणि प्रवीण यांची भेट प्रायोगिक नाटकांच्या दरम्यान झाली. त्यांच्यात सुरूवातीला मैत्री झाली त्यानंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. प्रवीण तरडे यांची त्यावेळेस आर्थिक परिस्थिती पाहता स्नेहल यांच्या घरच्यांनी त्यांच्या लग्नाला विरोध केला होता. त्या दोघांमध्येही 12 वर्षांचे अंतर आहे. त्यांनी त्यानंतर 2009 साली लग्न केले.
सध्या त्यांच्या या व्हायरल व्हिडीओखाली नानाविध कमेंट्स येयाला सुरूवात झाली आहे. यावेळी त्यांच्या या रोमॅण्टिक व्हिडीओवर सगळ्यांनी खूप गोड कमेंट्स केल्या आहेत.