मुंबई : टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये काही असे कपल्स आहेत. जे लवकरच पालक होणार आहेत. ज्यामध्ये आलिया भट्ट-रणबीर कपूर (Alia Bhatt Ranbir Kapoor) आणि बिपाशा बासु-करण सिंह ग्रोवर (Bipasha Basu Karan Singh Grover) यांच्या नावांचा समावेश आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीव्ही इंडस्ट्रीबद्दल बोलायचं झालं तर, रामायणमध्ये मुख्य भूमिका साकारणारे स्टार्स गुरमीत चौधरी (Gurmeet Chaudhary) आणि देबिना बनर्जी (Debina Bonnerjee) लवकरच पालक होणार आहेत. गुरमीत आणि देबिनाने आपल्या मुलीला जन्म दिल्यानंतर लगेचच एक-दिड महिन्यात दुसऱ्या प्रेग्नंसी अनाउन्समेंन्ट केली. आम्ही तुम्हाला सांगतो की, नुकतच या अभिनेत्रीने बोल्ड फोटोशूट केलं आहे. ज्यासाठी तिला खूप ट्रोल केलं जात आहे. शर्टलेस होत अभिनेत्रीने हे फोटोशूट केलं आहे.


देबिना बॅनर्जी तिच्या प्रेग्नेंसी फोटोशूटमुळे ट्रोल झाली.
देबिना बोनर्जीने तिच्या बोल्ड प्रेग्नेंसी फोटोशूटचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोशूटमधील अभिनेत्रीची बोल्ड स्टाईल अनेकांना पसंत पडली नाही. व्हिडिओमध्ये देबिनाने फक्त पांढरा शर्ट घातला आहे, जो तिच्या खांद्यावरून खाली सरकलेला दिसत आहे. शर्टलेस असलेली डेबिनाने शर्टच्या आतमध्ये काळ्या रंगाचे अंतर्वस्त्र घातलेले दिसत आहेत.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


या लूकला पुर्ण करण्यासाठी अभिनेत्रीने आपले केस मोकळे सोडले आहेत. आणि आपल्या बेबी बम्पला पकडून पोज देत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, देबिना बॅनर्जीला यासाठीही ट्रोल केलं जात आहे की, तिने पेन्सिल हिल्स घालून फोटोशूट केलं आहे. देबिनाने हिल्स घालण्यासाठी कोणाची तरी मदतही घेतली यामुळेही तिला ट्रोल केलं जात आहे की, प्रेग्नंसीच्या या स्टेजमध्ये तिला हिल्स नाही घातले पाहिजे. (Pregnant TV Actress This actress got trolled badly due to pregnancy photoshoot He did such a thing by taking off his shirt that people started raining after seeing him)