मुंबई : बॉलिवूड ही एक अशी जागा आहे जिथे लोकांचे नशीब चमकणं सोपं नाही. प्रेक्षकांच्या नजरेत येण्यासाठी फक्त बिग बजेट चित्रपट असणं गरजेच नाही, तर अभिनय कौशल्य असणं गरजेचं आहे. पण अनेकवेळा असंही पाहायला मिळालं आहे की टॅलेंट आणि प्रसिद्धी दोन्ही मिळूनही कलाकार नैराश्याला बळी पडतात. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण, उदय चोप्रा यांच्यासह अनेक कलाकारांनी नैराश्याबद्दल उघडपणे बोलले आहे. एकदा तर आलिया भट्टही यावर बोलली आहे. पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, आलियानं खुलासा केला होता की ती बऱ्याच काळापासून चिंता आणि तणावावा जवळून पाहिलं आहे. ती अॅन्झायटी डिसऑर्डरची (Anxiety Disorder) शिकार झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आलियानं या मुलाखतीत सांगितलं की, ती नेहमीच दु:खी नसते, पण कधी अचानक आनंदी होते तर कधी अचानक दुःखी होते. आलिया म्हणाली की, 'मला या प्रकरणी माझी बहीण शाहीनचे आभार मानायचे आहे, ज्यामुळे मला या आजाराची जाणीव झाली. काही वेळा मला काही समजायचे नाही. मला असे वाटायचे की हे सर्व कामाच्या प्रेशरमुळे आहे आणि मी खूप काम करून दमले आहे किंवा मला कामामुळे कोणालाही भेटता येत नाही. (pregnent alia bhatt was battling against anxiety disorders) 



याबाबत कोणाशी तरी बोलणं खूप महत्त्वाचं असल्याचं आलियानं सांगितलं. ती तिच्या मित्रांशी या विषयी बोलली होती, ज्यांनी तिला सल्ला दिला होता की हे सर्व कालांतराने निघून जाईल. परंतु हे देखील आवश्यक आहे की जर तुमची तब्येत ठीक नसेल आणि अशा कोणत्याही आजाराने ग्रस्त असाल किंवा तुम्हाला बरं वाटत नसेल तर हे सगळं कोणाला तरी सांगायला हवं. 


आज आलिया तिच्या करिअरच्या त्या टप्प्यावर आहे, जिथे पोहोचणं जवळपास प्रत्येक अभिनेत्रीचं स्वप्न असतं. लहान वयातच तिला स्टारडम मिळालं आणि तिनं ते टिकवूनही ठेवलं. नुकताच तिचा 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट प्रदर्शित झाला, या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. सध्या आलियानं कामातून ब्रेक घेतला असून प्रेग्नेंसी पीरियड एन्जॉय करत आहे. तिची डिलिव्हरी डेट ही डिसेंबर 2022 आहे.