Preity Zinta Visit kamakhya temple: `प्रचंड अडचणींचा सामना करत मंदिरात पोहोचली अन्...`, प्रीति झिंटाची पोस्ट चर्चेत
Preity Zinta Visit kamakhya temple: प्रीति झिंटानं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. तिच्या या पोस्टवर कमेंट करत नेटकऱ्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर प्रीति झिंटानं कामाख्य मंदिरात जाताना तिला आलेल्या अनेक अडचणींनंतर तिला कसं वाटलं तिचा अनुभव कसा होता ते सांगितलं आहे.
Preity Zinta Visit kamakhya temple: बॉलिवूड अभिनेत्री प्रीति झिंटा (Preity Zinta) ही लोकप्रिय सेलिब्रिटींपैकी एक आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रीति ही सोशल मीडियावर चर्चेत आहे. प्रीति ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. प्रीति तिच्या आयुष्यातील अनेक छोट्या-मोठ्या गोष्टींची अपडेट ती देत असते. नुकतीच प्रीतिनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत प्रीतिनं तिला आलेल्या कामाख्या मंदिरात जाताना आलेला अनुभव सांगितला आहे. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. (Preity Zinta Viral Video)
प्रीतिनं ही पोस्ट तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे. या पोस्टमध्ये प्रीतिनं एक कोलाज व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत प्रीतिनं गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तर तिनं मंदिराच्या बाहेरील अनेक गोष्टींचे फोटो शेअर केले आहेत. दरम्यान, व्हिडीओत भेट म्हणून कामाख्य मंदिराची मूर्ती देण्यात आली होती. व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला म्युजिकनं Vangelis च्या ‘रथ्स ऑफ़ फायर’ बॅक ग्राऊंडला लावलं आहे.
प्रीतिनं हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शन दिलं की गुवाहाटी जाण्याचं खासं कारण म्हणजे इथलं लोकप्रिय कामाख्या देवी मंदिर आहे. माझी फ्लाइट बरेच तास लेट झाली आणि मी संपूर्म रात्र जागी राहिले. पण जेव्हा मी मंदिरात प्रवेश केला तेव्हा ते सगळ वाया गेल्या सारखं नाही वाटलं. जेव्हा मी तेथे गेले तेव्हा मला खूप पावरफुल असल्या सारखं वाटलं आणि शांतात जाणवली.'
हेही वाचा : 'नेने के देने पड गये...', Good Friday च्या शुभेच्छा दिल्यामुळे माधुरी दीक्षितचा नवरा ट्रोल
पुढे प्रीति म्हणाली, 'शांती आणि ग्रॅटिट्यूडचे हे क्षण आजूबाजूला असणाऱ्या सगळ्या गोंधळाला शांत करून ठेवणारे होते. त्यासाठी मी कृतज्ञ आहे. जर तुमच्यापैकी कोणी गुवाहाटीला भेट देत असेल किंवा यापुढे देणार असेल तर न चुकता कामाख्या मंदिरात जा. त्यानंतर तुम्ही मला धन्यवाद म्हणाला. जय मॉं कामाख्या जय माता दी.' प्रीतिच्या या पोस्टवर कमेंट करत नेटकऱ्यांनी जय माता दीं अशा कमेंट केल्या आहेत. (Preity Zinta kamakhya temple)
दरम्यान, प्रीति सध्या लॉस एंजिल्सला राहते. तिनं 29 फेब्रुवार 2016 साली लग्न केलं होतं. त्यांना जुळी मुलं देखील आहेत. सरोगसीच्या माध्यमातून 2021 साली त्यांचा जन्म झाला होता. त्या दोघांची नाव जय आणि जिया अशी आहेत.