Lata Mangeshkar : राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडून लता दीदींच्या निधनावर शोक व्यक्त
भारतरत्न लता मंगेशकर यांचं वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांचं संगित क्षेत्रातील योगदान हे संपूर्ण जगाला नेहमीच आठवणीत राहिल. त्यांच्या निधनाने संगित क्षेत्राचं मोठं नुकसान झालं आहे.
मुंबई : स्वर कोकिळा लता मंगेशकर यांचे रविवारी निधन झाले. लता मंगेशकर या ९२ वर्षांच्या होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांच्यासह अनेक नेत्यांनी लता मंगेशकर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. त्यांच्या निधनानंतर गडकरीही त्यांच्या अंतिम दर्शनासाठी ब्रीच कँडी रुग्णालयात पोहोचले.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गायिका लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, भारतरत्न, लताजींचे कर्तृत्व अतुलनीय राहील.'
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले की, मी माझे दु:ख शब्दांत व्यक्त करू शकत नाही. दयाळू आणि काळजीवाहू लतादीदी आम्हाला सोडून गेल्या. त्यांच्या जाण्याने देशात एक पोकळी सोडली आहे जी भरून काढता येणार नाही. येणाऱ्या पिढ्या त्यांना भारतीय संस्कृतीच्या एक दिग्गज म्हणून लक्षात ठेवतील, ज्यांच्या मधुर आवाजात लोकांना मंत्रमुग्ध करण्याची अतुलनीय क्षमता होती.'
नितीन गडकरी म्हणाले, देशाची शान आणि संगीत जगतातील मातब्बर भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाने अतिशय दुःख झाले आहे. त्या पवित्र आत्म्यास माझी भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांचे जाणे हे देशाचे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. सर्व संगीत साधकांसाठी त्या नेहमीच प्रेरणादायी होत्या. 30 हजारांहून अधिक गाणी गाऊन आपल्या आवाजाने संगीत जगताला संगीत दिले आहे. लता दीदी अतिशय शांत स्वभावाच्या आणि प्रतिभेने संपन्न होत्या.
केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले, 'सर्व देशवासियांप्रमाणे त्यांचे संगीत मला खूप प्रिय आहे, मला जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा मी त्यांनी गायलेली गाणी नक्कीच ऐकतो. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो व कुटुंबियांचे सांत्वन करो.'