मुंबई  : रोडीज, स्पिट्सव्हिला आणि त्यानंतर बिग बॉसच्या 9 व्या सीझानचा विजेता प्रिंस नरूला लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिग बॉसमधील स्पर्धक युविका चौधरीसोबतच प्रिंस रिलेशनशिपमध्ये आहे. प्रिंस आणि युविका सोशल मीडियावर ट्रेन्ड होत आहेत. त्यामुळे पुन्हा जोडी चर्चेमध्ये आली आहे. 


गुपचूप साखरपुडा 


युविका आणि प्रिंसने साखरपुडा आवरला असून लवकरच ही जोडी लग्नबंधनात अडकणार आहे. वर्षभरापूर्वी फेब्रुवारी 2017 मध्येच यांनी साखरपूडा केल्याची माहिती मिळत आहे.आता ही जोडी लग्नाचे प्लॅन्स करत आहे. सोशल मीडियावर त्यांच्या साखरपुड्याचा एक व्हिडिओ ट्रेंड करत आहे.  


इंस्टाग्रामवर प्रिंसचे बदलले नाव 



काही मीडिया रिपोर्ट्सच्या अनुसारे यंदा जून- जुलैमध्ये प्रिंस आणि युविका लग्न करण्याचा प्लॅन करत आहेत. प्रिंसने मुंबईत घर घेतले असून लवकरच दोघेही तेथे राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.  


प्रिंसने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर नावात बदल केला आहे. सध्या त्याच्या अकाऊंटचे नाव ' प्रिंस युविका नरूला' असे करण्यात आले आहे.  


 



 


दोघेही कलाक्षेत्रात 


प्रिंस नरूला हा 'रिएलिटी शो'चा 'प्रिंस' समजला जातो. त्याने टीव्हीवरील  तीन महत्त्वाचे शो जिंकले आहेत. यामध्ये रोडीज, स्प्लिट्सव्हिला, बिग बॉसचा समावेश आहे. 


युविका चौधरी 'ओम शांती ओम', 'समर 2007' 'तो बात पक्की' आणि 'द शौकिंस' या चित्रपटामध्येही काम केले आहे.