Prithvik Pratap's wish completed on shah rukh khan's birthday : बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानचे लाखो चाहते आहेत. काल त्याचा वाढदिवस होता, त्याच्या वाढदिवसानिमित्तानं प्रेक्षकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या. दरम्यान, महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता पृथ्वीक प्रतापनं केलेल्या पोस्टनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. त्यानं केलेली पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पृथ्वीकनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे.  या पोस्टमध्ये त्यानं त्याच्या नव्या घराची झलक दाखवली आहे. या फोटोत त्याच्यासोबत त्याच्या कुटुंबातील सदस्य देखील दिसत आहेत. हे फोटो शेअर करत पृथ्वीक म्हणाला 'आजवर अनेक स्वप्न पाहिली… अनेक पूर्ण केली…अनेक स्वप्न जगली आणि अनेक स्वप्न भंगली सुद्धा, पण एक स्वप्न जे आजपर्यंत हुलकावणी देत होतं ते पूर्णत्वाला आलं…आयुष्याची 30 वर्षे आश्रितासारखी काढलेल्या प्रत्येकाला एक दहा बाय दहाचं छप्पर ही आभाळापेक्षा कमी नसतं… आज स्वतःच्या घरापुढे उभं राहून हा फोटो काढताना खरच आभाळ ठेंगण झाल्यासारखं वाटतंय. घर छोटं आहे पण माझ्या कुटुंबाचं आहे. ही स्वप्नपूर्तीची वाटचाल अजून अशीच सुरू राहणार आहे कारण ‘पेन्टहाऊस’ अभी बाकी है मेरे दोस्त…! गंमत म्हणजे आज 2 नोव्हेंबरला हे घर माझ्या नावावर झालंय म्हणजे ‘शाहरुख खान’च्या वाढदिवशी. त्यामुळे माझी ‘मन्नत’ पूर्ण झाली असं म्हणायला हरकत नाही.'



पृथ्वीकची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्या आहे. पृथ्वीकच्या या पोस्टवर कमेंट करत सगळ्या सेलिब्रिटींनी शुभेच्छा दिल्या आहेत. पृथ्वीकच्या या पोस्टवर कमेंट करत पूजा सावंत, चेतन वडनेरे, वनिता खरात, स्वानंदी टिकेकर, निखिल बने, प्रथमेश परब, अभिजीत खांडेकर, ऋतुजा बागवे, श्रृती मराठे पासून अनेक कलाकारांनी त्याला नव्या घराच्या निमित्तानं शुभेच्छा दिल्या आहेत. तर दुसरीकडे त्यात सगळ्यात जास्त संख्या ही हास्यजत्रेतील कलाकारांनी आहे. याशिवाय पृथ्वीकनं अशी पोस्ट का केली आणि शाहरुखचा उल्लेख का केला असा सवाल अनेकांना असेल तर तो शाहरुखचा खूप मोठा चाहता आहे. त्यामुळे त्यानं ही खास पोस्ट शेअर करत त्याचा उल्लेख केला आहे. 


हेही वाचा : 'या' स्टारकिडची सगळेच उडवायचे खिल्ली, आज तोच आहे 3101 कोटींच्या संपत्तीचा मालक


पृथ्वीक आधी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील प्रसाद खांडेकरनं गणपती आधी नवीन घरात प्रवेश केला होता. तर त्याआधी सई ताम्हणकरनं मुंबईत तिचं हक्काच घर घेतलं आहे. तर याच शोची सुत्रसंचालक प्राजक्ता माळीनं या आधी कर्जतमध्ये तिचं फार्महाऊस घेतलं.