मुंबई : सेलिब्रिटी म्हटलं तर त्यांचं खासगी आयुष्य कसं असेल, त्यांची लाईफ स्टाईल कशी असते? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडलेले असतात. महत्त्वाचं म्हणजे जर प्रसिद्ध कलाकार असतील तर त्यांनी सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागतो. होणाऱ्या ट्रोलिंगवर कलाकार मोकळेपणाने बोलतात देखील.  मराठी अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रिया ही तिच्या बिनधास्त आणि हटके अभिनयासाठी ओळखली जाते. फक्त अभिनय नाही तर तिच्या सौंदर्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. (Priya Bapat on personal life)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण आता प्रिया खासगी आणि प्रोफेशन आयुष्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. नुकतीच प्रिया बापटने सुबोध भावेच्या ‘बस बाई बस’ कार्यक्रमात हजेरी लावली होती. ज्यात प्रियाने एका प्रश्नाचं उत्तर देताना सोशल मीडियावरील ट्रोलिंगचा (Priya Bapat  open about her trolling) धक्कादायक अनुभव शेअर केला.


प्रियाला सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी तिच्या आयुष्यातील एक धक्कादायक प्रसंग सांगितला. अभिनेत्री म्हणाली, 'एका क्लिपमुळे मला ट्रोल करण्यात आलं. लोक थेट घरात घुसतात याचा अनुभव मला तेव्हा आला...'



प्रिया पुढे म्हणाली, 'क्लिप व्हायरल झाल्यानंतर मी खासगी आयुष्यात कशी आहे. माझा नवरा मला सुख देतो की नाही... इथपर्यंत भाष्य केलं, तेव्हा मला प्रचंड वाईट वाटलं...' (Priya Bapat with Umesh Kamat)


'एक कलाकार म्हणून व्यावसायिक आणि वैयक्तीक आयुष्य आम्हाला वेगळं ठेवायलाच हवं. या सर्वगोष्टीतून बाहेर पडण्यासाठी मला 8 ते 10 दिवस लागले. मी अक्षरशः रडले. पण त्यावेळी उमेशने (Umesh Kamat) मला समजावलं होतं.' असं देखील प्रिया म्हणाली.