City Of Dreams मधील किसींग सीनवर Priya Bapat ची प्रतिक्रिया, म्हणाली `सगळ्या लोकांना फक्त...`
Priya Bapat City Of Dreams : प्रिया बापटनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या सिटी ऑफ ड्रिम्स या सीरिजच्या पहिल्या सीजनमध्ये दिलेल्या एका बोल्ड सीनविषयी सांगितलं आहे. खरंतर प्रियानं या सीरिजच्या पहिल्या सीजनमध्ये दिलेला हा बोल्ड सीन चांगलाच चर्चेत होता.
Priya Bapat : लोकप्रिय मराठमोळी अभिनएत्री प्रिया बापट ही सध्या तिच्या ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या सिरीजमुळे चर्चेत आहे. नुकताच या सीरिजचा तिसरा सीझन प्रदर्शित झाला आहे. या सीरिजनं पहिल्या सीजन पासून प्रेक्षकांना खिळवून ठेवलं होतं. आता पुढचा सीजन कधी पाहायला मिळणार अशी आशा नेहमीच त्यांच्या चाहत्यांना होती. पण तुम्हाला सगळ्यांना पहिल्या सीजनमधील प्रिया बापटचा एक बोल्ड सीन आठवण आहे का? अनेकांचे उत्तर हो असेच असेल. प्रिया बापटला असा सीन करताना पाहून अनेकांना आश्चर्य झाले होते. त्यानंतर काही लोकांनी तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं तर काही लोकांनी प्रियानं हा सीन शूट करण्याच्या निर्णयाची स्तुती केली.
प्रियाचा हा बोल्ड सीन म्हणजे लेसबीयन कीसिंग सीन होता. या सीनमध्ये प्रियाला एका महिला अभिनेत्रीला किस करताना पाहून अनेकांना आश्चर्य झाले. या सगळ्यावरून सुरु असणाऱ्या चर्चांचा प्रियावर कसा परिणाम झाला हे तुम्हाला माहितीये का? इतकंच काय तर त्यावर प्रियाची काय प्रतिक्रिया आहे याविषयी देखील प्रियानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. प्रियानं ही मुलाखत लोकसत्ताच्या डिजिटल अड्डाला दिलेल्या मुलाखतीत याविषयी सांगितलं आहे. "सीरिज प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील तो एकच सीन सगळीकडे व्हायरल झाला होता. सुरुवातीचे काही दिवस याचा मला खूप त्रास झाला आणि हा त्रास मानसिक होता. तो सीन त्या स्क्रिप्टची गरज आहे म्हणून मी केला होता. त्यानंतर माझ्यासाठी ते तिथेच संपलं होतं. कारण त्याच मुद्यावर संपूर्ण वेबसीरिज ही अवलंबून आहे असं देखील नव्हतं. पण सगळ्यालोकांनी फक्त तो एकच मुद्दा धरून ठेवला. मला असं वाटतं की प्रेक्षकांनी या दोन्ही गोष्टींकडे वेगवेगळ्या पद्धतीनं पाहावं. या वेबसीरिजमध्ये त्या भूमिकेला समलैंगिकतेवर होती. त्यामुळे तो त्या भूमिकेचा महत्त्वाचा भाग होता," असं प्रिया या मुलाखतीत म्हणाली.
पुढे प्रिया ती भूमिका साकारण्याविषयी म्हणाली की, मी एक अभिनेत्री आहे, ते माझं काम आहे आणि मी माझं काम करेत. ते काम केल्यानंतर मी त्यातून बाहेर देखील पडलेली असते पण लोक त्यातून बाहेर येत नाहीत. त्याच त्या विषयावर सतत बोलत राहतात. आता लोक मला काय बोलतील याची मला काही काळजी नाही. कारण जेव्हा त्यांना माझं काम आवडेल तेव्हा ते सगळ्या गोष्टी शांतपणे स्वीकारतील.
हेही वाचा : परिणीति चोप्राशी लग्न करण्याआधी Raghav Chadha यांनी केली नाकाची सर्जरी!
‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या सीरिजविषयी बोलायचं झालं तर त्यात प्रिया बापटसोबत अतुल कुलकर्णी, सचिन पिळगावकर, एजाज खान, सुशांत सिंग हे कलाकार आहेत.