मुंबई : पती- पत्नीचं नातं हे कायमच शब्दांत व्यक्त करण्यापलीकडलं असतं. आयुष्यातील चढ- उतारांवर एकमेकांना साथ देणारी ही माणसं कित्येकदा आव्हानात्मक प्रसंगांसमोर उभी ठाकतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हीच आव्हानात्मक वळणं नात्याची आणि पती- पत्नीची परीक्षा पाहतात. असंच एक वळण कित्येकदा या नात्यावर धडकतं. हे वळण असतं जेव्हा 'तिला' मासिक पाळी येते. मासिक पाळी, मूड स्विंग्स आणि वेदना अशा या गोष्टी महिला वर्गाला चुकलेल्या नाहीत. याच विषयाला अतिशय सुरेखपणे हाताळत 'आणि काय हवं' या वेब सीरिजचा तिसरा सिझन नुकताच प्रदर्शित झाला. 


(Aani Kay Hava Season 3)'आणि काय हवं' मध्ये 'पिरीएड्स' अर्थात मासिक पाळी सारखा विषय हाताळला जाण्याबद्दल प्रिया आणि उमेशनं सांगित महत्त्वाचे मुद्दे मांडले, ''जेव्हा आम्हाला कळलं की, 'पिरीएड्स' सारखा विषय आपण प्रेक्षकांसमोर मांडणार आहोत, तेव्हा आमच्या मनात काहीशी साशंकता होती. प्रेक्षक हा विषय कसा स्वीकारतील, परंतु जेव्हा आम्ही स्क्रिप्ट पाहिली आणि त्याचे शूट पूर्ण केले तेव्हा ती शंका नाहीशी झाली. इतक्या सहजरित्या ते आम्ही चित्रित केलं. वरुणने हा विषय अगदी छान पद्धतीने हाताळला आहे. या दिवसांत नवऱ्याची साथ किती महत्वाची असते, हे खूपच छान मांडलं आहे.' 


टेलिव्हीजन अभिनेत्रीच्या डोक्यात पडला मेटल रॉड; रुग्णालयात दाखल 


 


मासिक पाळीच्या दिवसांत नवऱ्याची साथ पत्नीसाठी तितकीच महत्त्वाची आहे, असं म्हणताना भूमिकेसोतच प्रत्यक्ष आयुष्यातही या साऱ्याचं किती महत्त्वं आहे हे प्रियानं स्पष्ट केलं. 



'आणि काय हवं'मध्ये 'जुई' आणि 'साकेत' एका समारंभाला जाण्यासाठी निघतात आणि जुईला 'पिरीएड्स' आल्याचे लक्षात येते. त्यानंतर जुईचे मूड स्विंग्स, साकेतला तिच्याबद्दल वाटणारी काळजी, लहानपणीच्या मासिक पाळी संबंधीच्या दोघांच्या आठवणी, सॅनिटरी पॅड हे अगदी छान आणि हलक्याफुलक्या पद्धतीने मांडण्यात आलं आहे. या नाजूक विषयाला कुठेही धक्का लागणार नाही आणि कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत, याची पुरेपूर काळजी घेत लेखक, दिग्दर्शक वरूण नार्वेकर यांनी हा विषय प्रेक्षकांसमोर आणला आहे.