Priya Berde On Gautami Patil : गेल्या काही दिवसांपासून डान्सर गौतमी पाटील (Gautami Patil) ही तिच्या डान्स आणि शोमुळे चर्चेत आहे. तिच्या शोला लोकांची गर्दी पाहायला मिळते. तिच्यासाठी अनेक बाऊंसर्स तिथे उपस्थित होतात. कोणताही छोटा-मोठा कार्यक्रम असो तरी गावात गौतमीला बोलावण्यात येते. कधी गौतमी तिच्या अश्लील डान्स केला म्हणून चर्चेत होती. तर आता तिच्या शोला असणाऱ्या गर्दीमुळे ती चर्चेत आहे. अनेक लोक गौतमी अश्लील डान्स करते असं सतत बोलताना दिसतात. दरम्यान, या सगळ्यावर आता लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्रिया बेर्डे (Priya Berde) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रिया बेर्डे सांगलीत एका कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. त्यावेळी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी गौतमीच्या शोला असणारी गर्दी आणि तिच्या डान्सवर प्रतिक्रिया दिली आहे. 'या सगळ्याला जबाबदार हे बघायला येणारे लोकही जबाबदार आहेत. अशी गाणी आणि तमाशा चवीने बघणारे जोपर्यंत जातील तोपर्यंत हे सगळं थांबणार नाही. ते जेव्हा अशा शो कडे पाठ फिरवतील तेव्हा हे बंद होईल. आम्ही किंवा मग राज्यकर्ते यांनी कितीही ओरडून सांगितलं किंवा निषेध केला तरी काही होणार नाही. लोक खूप मानधन देऊन त्यांना बोलवतात', असे प्रिया बेर्डे म्हणाल्या. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


पुढे प्रिया बेर्डे म्हणाल्या, आम्ही काही बोललो की आम्हालाही ट्रोल करण्यात येत. याचा अर्थ असा नाही की आम्ही काही बोलणार नाही किंवा त्यावर बोलणं पूर्णपणे थांबवू. अशा गोष्टींवर आम्ही सतत बोलत राहणार. पण आम्ही बोलल्याचा तेव्हाच परिणाम होईल जेव्हा लोक स्वत: ते बघणं बंद करणार नाहीत. 


ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी व्यक्त केली होती खंत


काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी गौतमीच्या डान्सच्या शोला असणाऱ्या गर्दीवर टीका केला होती. अनेक लोक ही 100 लावणी कलावंतांसाठी दोन लाख रुपये द्यायलाही तयार नसतात, पण या पाच जणींच्या कार्यक्रमासाठी पाच लाख रुपये दिले जातात, असं म्हणतं त्यांनी खंत व्यक्ती केली होती. 


हेही वाचा : 'भाड़ में जाए रणबीर कपूर...', खराब फॅशन म्हणणाऱ्या अभिनेत्याच्या कमेंटवर Urfi Javed चं सडेतोड उत्तर


प्रिया बेर्डे यांच्या विषयी बोलायचे झाले तर काही महिन्यांपूर्वीच त्यांनी राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केला आहे. नाशिकला भाजप नेते चंद्रकांत बावणकुळे यांच्या उपस्थितीत प्रिया बेर्डे यांनी भाजपात प्रवेश केला. 


दरम्यान, गौतमीचं 'तेरा पता' हे गाणं नुकतचं प्रदर्शित झालं असून हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. तर लवकरच गौतमीचा 'घुंगरू' (Ghungroo) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.