मुंबई : साऊथ सिनेसृष्टीचा नुकताच SIIMA अवॉर्ड्शो बंगळुरूमध्ये पार पडला. या अवॉर्ड्शोमध्ये साऊथ सिनेसृष्टीतील अनेक स्टार्स सहभागी झाले होते. साऊथ चित्रपटातील अनेक अभिनेत्रींनी देखील या अवॉर्ड्शोला हजेरी लावली होती. या अभिनेत्रीच्या हजेरीने अवॉर्ड्शोमध्ये चार चॉंद लागले होते. त्यात या अवॉर्ड्शोमध्ये अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर (Priya Prakash Varrier)  सर्वांचे लक्ष वेधून गेली होती. तिच्या लुकची एकच चर्चा रंगली होती. आता तिने या संदर्भातला एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओची खुप चर्चा रंगली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रिया (Priya Prakash Varrier) ही मल्याळम चित्रपटातील एक मॉडेल आणि एक अभिनेत्री आहे. ती नेहमीच तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते. तिचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ अनेकदा व्हायरल होत असतात. आता असाच अवॉर्ड्शोमधला तिचा लुक चर्चेत आला आहे. या लुकमधला तिने अवॉर्ड्शोमधला एक खास व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे. 


प्रियाने (Priya Prakash Varrier) तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर SIIMA Awards 2022 शी संबंधित एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये प्रियाचा अतिशय ग्लॅमरस लूक दिसत आहे. ब्लॅक कलरचा वन पीस ड्रेस तिने परिधान केला होता. यासह तिने तिचा लुक पुर्ण करण्यासाठी केस दुमडले होते आणि शानदार मेकअप केला होता. हा संपुर्ण लुक तिच्या सौंदर्यात भर घालत होता. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by SIIMA (@siimawards)


दरम्यान प्रिया प्रकाश वारियरचा (Priya Prakash Varrier) हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर प्रचंड कमेंट आणि लाईक्स मिळत आहे. हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.