PRIYA PRAKASH WARRIOR NEWS VIDEO VIRAL:  तुम्हाला प्रिया प्रकाश वॉरियर आठवते का ? जिने खास स्टाईल मध्ये डोळे मारून सर्वाना घायाळ केलं होतं. ज्या गोष्टीमुळे रातोरात ती नॅशनल क्रश बनली होती तीला खूप प्रसिद्धी मिळाली होती.आता पुन्हा एकदा प्रिया प्रकाश चर्चेत आलेय यावेळीसुद्धा  तिने असं काही केलयं की तीचं कौतुक करता करता तिचे फॅन्स थकत नाहीयेत,प्रियाचा हा व्हिडिओ पाहूनदेखील हजारो जण घायाळ झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 
साऊथची अभिनेत्री प्रिया प्रकाश वॉरिअरने नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केलाय या व्हिडीओमध्ये ती गाणं गातेय रणबीर आणि आलियाच्या अपकमिंग ब्रम्हास्त्र सिनेमातील हे गाणं आहे प्रियाच्या या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय.खूप व्हायरलही होतोय हा व्हिडीओ. 


 



या व्हिडिओमध्ये प्रिया प्रकाश  निळ्या रंगाच्या ड्रेस मध्ये दिसतीये त्याचसोबत  तिने मेकअपसुद्धा केलेला नाहीये तिच्या या नो मेकअप लुकची जास्त चर्चा होतेय.या व्हिडीओनंतर प्रिया प्रकाशच्या आवाजाची सर्वजण खूप प्रशंसा करत आहेत. 


२०१८ मध्ये प्रियाचा एक व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता या व्हिडिओनंतर तीला विंक गर्ल म्हणून नाव मिळालं होतं आणि प्रसिद्धी सुद्धा... तेलगू आणि कन्नड मधील 'चेक' आणि 'इश्क' या सिनेमांमध्ये प्रिया दिसून आलेय,लवकरच प्रिया बॉलीवूडमध्ये देखील दिसण्याची शक्यता आहे