तरुणाईला वेड लावणाऱ्या प्रियाचा नवा व्हिडिओ व्हायरल....
दिलखेचक अदांनी तरुणाईला वेड लावलेल्या प्रिया वारियरची जादू अजूनही कायम आहे.
मुंबई : दिलखेचक अदांनी तरुणाईला वेड लावलेल्या प्रिया वारियरची जादू अजूनही कायम आहे. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेली प्रिया सतत काही ना काही कारणास्तव चर्चेत असते. अशातच तिचा अजून एक व्हिडिओ व्हायरल होतोय. व्हिडिओतही प्रियाच्या दिलखेचक अदा पाहायला मिळताहेत.
हा व्हिडिओ काहीसा वेगळा
यापूर्वी व्हायरल झालेला व्हिडिओ हा मल्याळम सिनेमा उरू अदार लव या सिनेमातील होता. पण आता इन्स्टाग्रामवर शेअर केलेला व्हिडिओ काहीसा वेगळा आहे. या व्हिडिओत प्रिया मेकअप करताना दिसत आहे. मेकअप झाल्यानंतर ती तिच्या अदांनी चाहत्यांना घायाळ करत आहे.
प्रिया यात ठरली अव्वल
प्रिया प्रकाश गुगल सर्चमध्ये अव्वल ठरली आहे. तिने चक्क सनी लियोनीला मागे टाकले आहे. तिची लोकप्रियता इतकी वाढली आहे की फक्त सनीच नव्हे तर बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदूकोण आणि कतरिना कैफलाही तिने मागे टाकले आहे. इतकंच नाही तर इन्स्टाग्रामवर तिचे फॉलोव्हर्स रातोरात वाढले.