मुंबई : बॉलिवूडमध्ये (Bollywood) आतापर्यंत अनेक अभिनेत्रींनी आत्महत्या करत जीवन संपवलं, तर काही अभिनेत्रींचा दुर्दैवी अंत झाला. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे प्रिया राजवंश (Priya Rajvansh). एक काळ असा होता जेव्हा प्रिया राजवंश यांचा बॉलिवूडमध्ये बोलबाला होता. प्रसिद्ध अभिनेत्रींच्या अव्वल स्थानी प्रिया होत्या. आज प्रिया आपल्यात नसल्या तरी त्यांच्या अनेक आठवली आजही जीवंत आहेत. करियरच्या उच्च शिखरावर चढत असताना प्रिया आणि दिग्दर्शक चेतन आनंद यांच्या प्रेमाचा गुलाब बहरला. (priya rajvansh husband)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रिया यांनी 1964 मध्ये 'हकीकत' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि हा चित्रपट त्यांच्या काळातील हिट चित्रपटांपैकी एक होता. देव आनंदचे मोठे भाऊ चेतन आनंद यांनी प्रिया यांना सिनेसृष्टीत आणलं होतं. जे इंडस्ट्रीतील प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते होते.


मीडिया रिपोर्ट्सनुसार, चेतन आनंदची (Chetan Ananad) प्रिया राजवंशसोबतची जवळीक वाढू लागली आणि प्रिया यांच्या मनातही चेतन यांनी घर केलं होतं.  चेतन यांचं लग्न झालं होतं. पण ते पत्नी आणि मुलांपासून वेगळे राहत होते. चेतन आणि प्रियामध्ये (Chetan-Priya) सगळं काही सुरळीत चालू होतं, असं देखील समोर आलं.



पण अभिनेत्रीच्या आयुष्यात ट्विस्ट 1997 मध्ये चेतन यांच्या मृत्यूनंतर आला. चेतन गेल्यानंतर जेव्हा मृत्यूपत्र वाचण्यात आलं तेव्हा त्यात असं दिसून आलं की, चेतन यांनी त्यांची सगळी प्रॉपर्टी प्रिया राजवंश यांच्या नावे केली होती. (priya rajvansh age)


चेतन आनंद यांच्या दोन्ही (Chetan family) मुलांना जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा ती त्यांना खटकली.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, चेतन यांची दोन्ही मुलं त्यांच्या वडिलांसोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होते. 



वडिलांचं प्रिया यांच्याशी असणारं नातं पाहता त्यांना प्रिया यांचा प्रचंड राग यायचा. हीच गोष्ट प्रिया यांना महागातही पडली आणि त्यामुळेच त्यांची हत्या करण्यात आली. असं म्हटलं जातं की, प्रियाच्या हत्येसाठी चेतन यांच्या दोन्ही मुलांवर आरोप करण्यात आला होता. (Chetan-Priya love life)


चेतन आनंदच्या दोन्ही मुलांनी नोकरांना पैशाचं आमिष दाखवलं. आणि नोकरांनीही हे करण्यास होकार दिला.  नंतर पोलीस तपासात या मृत्यूचं गूढ समोर आलं. चेतन यांच्या दोन्ही मुलांनी घरात काम करणाऱ्या नोकरांच्या मदतीने प्रिया यांची हत्या केल्याचं समोर आलं. हत्येनंतर दोन वर्षांनी म्हणजे 2002 मध्ये चारही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.