मुंबई : फेब्रुवारीमध्ये मल्याळी अभिनेत्री प्रिया प्रकाश वॉरियरचा डोळा मारतानाचा व्हिडियो व्हायरल झाला. पुढचे कित्येक दिवस इंटरनेटवर सर्वांसाठी चर्चेचा हाच विषय ठरला. आता तिला बॉलिवुडचा सिनेमा मिळाला.


रणबीरसोबत काम करायचय 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार, व्हिडियो व्हायरल होताच प्रियाकडे बऱ्याच ऑफर्स आल्या. 'सिम्बा' चा सहनिर्माता असणाऱ्या करण जोहरलाही प्रियाला सिनेमात घेण्याची इच्छा आहे. रणवीरसोबत काम करण्याची इच्छा प्रियाने याआधी व्यक्त केली.


२१ डिसेंबरला सिम्बा 


 रोहित शेट्टी 'सिम्बा'चे दिग्दर्शन करत आहेत. सिनेमामध्ये रणवीर पोलिसाच्या भुमिकेत दिसणार आहे. २१ डिसेंबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे. 


मोठा रोल नाही 


वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, सिनेमामध्ये  प्रियाकडे मोठा रोल नाहीए.पण प्रियाच्या चेहऱ्याच्या एक्सप्रेशनचे सर्व चाहते झाले आहेत. याचा फायदा बॉलीवुडलाही करून घ्यायचाय. 


इतकी आहे तिच्या एका पोस्टची किंमत


‘उरु अदार लव्ह’या मल्याळम सिनेमातील तिचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. त्यातीत तिचे हावभाव व दिलखेचक अदांनी अनेकजण घायाळ झाले. आणि रातोरात तिच्या फॉलोअर्सची संख्या वाढली. सध्या तिने या अकाऊंटवरून अनेक मोठमोठ्या ब्रॅँडचं प्रमोशन सुरू केलं आहे. या प्रमोशनमधून ती बक्कळ पैसा मिळवत आहे.


एका ब्रॅंडची एक पोस्ट करण्यासाठी तिला तब्बल ८ लाख रुपये मिळतात. तिची लोकप्रियता आणि फॉलोअर्सची वाढती संख्या यामुळे अनेक मोठे ब्रॅँडस प्रमोशनसाठी तिला विचारत आहेत.


त्यामुळे सोशल मीडिया हे प्रियाच्या कमाईची चांगलेच साधन झाले आहे. सध्या तिचे इन्स्टाग्रामवर ५१ लाख फॉलोअर्स आहेत. तिच्या या प्रसिद्धीमुळे तिला नॅशनल क्रश म्हणून संबोधले जाते.


प्रदर्शनापूर्वीच प्रियाचा जलवा


तिचा ‘उरु अदार लव्ह’हा सिनेमा जूनमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वीच तिची लोकप्रियता आणि कमाई थक्क करणारी आहे.