Priyadarshini Indalkar Rukhwat : महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय आणि जुनी परंपरा म्हणजे लग्नात देण्यात येणार 'रुखवत'. लग्नामध्ये येणाऱ्या सगळ्या परंपरा या रुखवताशिवाय अपूर्ण आहेत. आजकाल या परंपरेला चित्रपट, नाटक आणि कथेच्या माध्यमातून नव्याने प्रगल्भ आणि प्रदर्शित केले जात आहेत. आपण महाराष्ट्रातील कोणत्याही कोपऱ्यातील असलो तरी रुखवत हा लग्नाच्या कार्यक्रमातील न बदलणारा भाग आहे. त्यावर आधारीत एक चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रातील परंपरा आणि सांस्कृतिक महत्त्व 'रुखवत' या चित्रपटाद्वारे लोकांसमोर येणार आहे. नुकताच या चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘रुखवत’च्या मोशन पोस्टर मध्ये वधू-वराच्या वेशात सुंदर नटलेली बाहुला -बाहुली, मंगळसूत्र आणि हळदी-कुंकू लग्नसरायच्या धावपळीत लोकांचं लक्ष वेधून घेतेय. पोस्टरमध्ये खास दोन अशा गोष्टी आहेत ज्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधले आहे ते म्हणजे अभिनेता संतोष जुवेकर आणि प्रियदर्शिनी इंदलकर. या दोघांच्या फोटोंमुळे सगळ्या प्रेक्षकांना त्या दोघांना एकत्र पाहण्याची जी उत्सुकता आहे ती आणखी वाढली आहे. या दोघांमुळे चित्रपटाच्या कथेची गोडी आणि गांभीर्यता स्पष्टपणे दिसून येत आहे. 'रुखवत'मध्ये दोन प्रेमवेड्यांची कहाणी अनोख्या पद्धतीने पाहायला मिळणार असल्याची चाहूलही मिळतेय.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

'रुखवत' ही महाराष्ट्राच्या प्राचीन आणि समृद्ध परंपरांपैकी एक आहे. लग्नाच्या वेळी वधूपक्षाकडून वरपक्षाला कलात्मक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या वस्तू भेट देण्याची ही परंपरा नवविवाहित जोडप्यासाठी शुभेच्छांचा प्रतीक मानली जाते. यात भांडी, हस्तकला, पारंपरिक वस्त्र, पूजा साहित्य, बाहुल्या यांचा समावेश असतो. ही परंपरा नातेसंबंधांना अधिक घट्ट करण्याबरोबरच, संस्कृतीचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम आहे. 


हेही वाचा : यूट्यूबर अरमान मलिक मुलांच्या नॅनीला करतोय डेट; पुन्हा करणार लग्न? ती म्हणाली; 'हे सगळं आईला...'


या चित्रपटाच्या कलाकारांविषयी बोलायचं झालं तर संतोष जुवेकर, प्रियदर्शिनी इंदलकर, अशोक समर्थ, अभिजीत चव्हाण आणि राजेंद्र शिसातकर हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन विक्रम प्रधान यांनी केले आहे. विक्रम प्रधान हे एक प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत, ज्यांनी आपल्या कथा आणि चित्रपटांद्वारे दर्शकांना वेगवेगळ्या अनोख्या अनुभवांची वासना दिली आहे. 'रुखवत' मध्ये त्यांनी सांस्कृतिक धारा आणि थ्रिलर कथानक यांचे सुंदर मिश्रण साकारले आहे. 'रुखवत' हा चित्रपट अल्ट्रा मीडिया & एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत, रब्री प्रोडक्शन निर्मित आणि निर्माती ब्रिंदा अग्रवाल आहे. 13 डिसेंबर 2024 रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्राक प्रदर्शित होणार आहे.