Youtuber Armaan Malik Getting Married Once Again : युट्यूबर अरमान मलिक हा नेहमीच त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. कधी त्याचं चर्चेत येण्याचं कारण त्याच्या दोन्ही पत्नी असतात तर कधी त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट आणि व्लॉग्स. सध्या त्याचं चर्चेत असण्याचं कारण त्याच्या तिसऱ्या लग्नाची चर्चा आहे. त्याविषयी अरमान मलिक आणि त्याच्या दोन्ही पत्नींनं स्वत: खुलासा केला आहे.
युट्यूबर अरमान मलिक त्याच्या चौथ्या लग्नामुळे आणि दोन्ही पत्नींमुळे चर्चेत असतो. आता अरमानचं नाव हे त्याचा मुलाच्या नॅनी लक्ष्यसोबत जोडण्यात आलं आहे. त्याचं कारण म्हणजे करवाचौथच्या वेळ लक्ष्यच्या हातावर संदीप नावाची मेहंदी पाहायला मिळाली. इतकंच नाही तर त्या दोघांनी डान्स देखील केला. त्यामुळे अरमान आणि लक्ष्यला पाहून तो पुन्हा एकदा लग्न बंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात होते. हे पाहता त्याच्या दोन्ही पत्नींनं यावर स्पष्टीकरण देत सांगितलं की असं काही नाही आहे. अरमान मलिक हा चौथ्यांदा लग्न बंधनात अडकत नाही आहे.
अरमान मलिकच्या दोन्ही पत्नींनी यावर स्पष्ट वक्तव्य केल्यानंतरही लोकांमध्ये चर्चा ही सुरुच आहे. अरमानचा एक व्हिडीओ आता समोर आला आहे. या व्हिडीओत तो लक्ष्यसोबत आउटिंगवर जाताना दिसत आहे. अरमान या व्हिडीओत सांगताना दिसला की 'तो थोडावेळ फिरायला जात आहे. तर त्यानं लक्ष्यला विचारलं की आम्हाला दोघां विषयी इतक्या वाईट कमेंट येतात तर तुझी आई तुला काही बोलत नाही का? त्यावर उत्तर देत लक्ष्यनं सांगितलं की आईला माहित आहे की, इथे वातावरण कसं असतं हे तिला माहित आहे. तुमच्याविषयी आणि दीदींविषयी देखील आईला माहित आहे. आपल्या नात्याविषयी देखील तिला माहित आहे.'
पुढे लक्ष्य म्हणाली की, 'तिला माझ्यावर विश्वास आहे, त्यामुळेच तर मला 3 वर्षांपासून इथे राहू दिलं आहे. नाही तर तिनं मला कधीच परत बोलावलं असतं. जेव्हा काही चुकीचं नाहीच आहे तर माझी आई का काही बोलेल.'
हेही वाचा : इब्राहिम आणि पलक Maldives Holiday फोटो शेअर करत रिलेशनशिप केलं Confirm?
दरम्यान, लक्ष्य ही अनेक वर्षांपासून अरमानच्या घरी राहते. तर अरमानच्या चारही मुलांची काळजी घेते. अरमानसोबत रील देखील बनवते. तिचे रिल्स देखील सोशल मीडियावर व्हायरल होतात.