`चांगल दिसणं म्हणजे...`, प्रियामणीचं चित्रपटसृष्टीतील ब्यूटी स्टॅन्डर्सवर मोठं वक्तव्य, तुम्हाला हे पटतंय का?
Priyamani on Industry Beauty Standards : प्रियामणीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चित्रपटसृष्टीतील ब्यूटी स्टॅन्डर्सवर मोठं वक्तव्य केलं आहे.
Priyamani on Industry Beauty Standards : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी ते आता बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयानं छाप सोडणाऱ्या अभिनेत्रींमध्ये प्रियामणी राजचं देखील नावं आहे. नुकताच प्रियामणीचा 'मैदान' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अजय देवगणशिवाय अनेक बड्या कलाकारांची भूमिका पाहायला मिळाली आहे. चित्रपट समिक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असताना आता प्रियामणीची एक मुलाखत चर्चेत आली आहे.
प्रियामणीनं नुकतीच 'न्यूज18 शोशा'ला दिलेल्या मुलाखतीत खासगी आयुष्यापासून प्रोफेश्नल लाइफपर्यंत अनेक गोष्टींवर खुलासा केला आहे. त्यासोबत प्रियामणीनं 'साइज जीरो' विषयी देखील तिनं प्रतिक्रिया दिली आहे. प्रियामणी म्हणाली, लोकं नेहमी बोलतात की मी माझ्या इतर प्रतिस्पर्धीप्रमाणे का दिसत नाही. असं म्हणणारे माझ्या कुटुंबातील अनेक लोक आहेत, ते काही निगेटिव्ह पद्धतीनं बोलत नाही किंवा त्यांना मला डिमोटिव्हेट करायचं आहे असं देखील नाही. माझं म्हणणं आहे की जर तुम्हाला सुंदर दिसायचं आहे तर दिसा. तुम्ही तुमच्या परफेक्ट लूकसाठी कोणतीही हद्द पार करु शकतात. शेवटी हे सगळं आपल्या वैयक्तिक निर्णयावर किंवा आवडीवर अवलंबून असतं. मी एका अशा इंडस्ट्रीतून आहे, जिथे तुलना होणं हे साधारण आहे.
पुढे प्रियामणी म्हणाली की आजकालच्या अभिनेत्री खूप फीट आहेत. त्या जे काही खातात आणि कशा दिसतात त्याचा खूप विचार करतात. पण एक वेळ होती जेव्हा काही अभिनेत्री काही तरी जास्तच कॉन्शियस असायच्या, पण तेव्हा प्रेक्षकांनी ज्या अभिनेत्री स्क्रिनवर हेल्दी दिसतात अशा अभिनेत्रींना पसंत करणं सुरु केलं. त्यांना स्क्रिनवर पाहून अनेक लोक त्यांच्याशी रिलेट करु लागले. साइज झीरोला घेऊन जी चिंता होती ती संपली.
अभिनेत्रींचे बोटॉक्स आणि फिलर्स
अभिनेत्री बोटॉक्स आणि फिलर्स करतात त्यावर प्रियामणी म्हणाली की अनेक अभिनेत्री या त्वचेच्या डॉक्टरांकडे जातात, जेणेकरून त्या सुंदर दिसू लागतील आणि त्यात काही चूक नाही. जर कोणाला इंडस्ट्रीमध्ये नाव कमवायचं आहे आणि त्वचेवर तजेलदार म्हणजे क्लिअर दाखवायचं आहे, तर त्यात काहीही चूक नाही. पण मी जेव्हा 2002 मध्ये माझं करिअर सुरु केलं होतं तेव्हा मी कोणत्याही ब्यूटी स्टॅंडर्ड्सला फॉलो करत नव्हती. मला कधीच कोणी सर्जरी करण्याचा सल्ला दिला नाही. पण कोणी असं केलं असतं तर मी त्याला गप्प केलं असतं किंवा चित्रपट सोडला असता. त्याचं कारण म्हणजे वैयक्तिकरित्या मी अशा कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवत नाही.