Priyanka Chopra Shah Rukh Khan : प्रेम, मैत्री, ओळख, विवाहबाह्य प्रेमसंबंध...  कलाविश्वामध्ये नात्यांची ही समीकरणं कधी आणि कशी बदलतील यासंदर्भात कोणतीही शाश्वती नाही. याची अनेक उदाहरणंही आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. कैक वर्षापासूनची नाती या कलाविश्वात एका क्षणात तुटली आहेत तर, नवी नाती तितक्याच वेगानं प्रसिद्धीझोतातही आली आहेत. अशा या नात्यांच्या गर्दीत एका अफेअरनं सर्वांनाच हैराण केलं होतं. ते कथित प्रेमप्रकरण होतं अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि बॉलिवूडचा किंग, शाहरुख खानचं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कथित प्रकरण म्हणता म्हणजे खुद्द प्रियांकानंच एका मुलाखतीदरम्यान तिच्या Ex Boyfriend चा उल्लेख करत एक जॅकेट सर्वांसमोर आणलं होतं आणि तिथंच तिचा हा पूर्वाश्रमीचा प्रियकर दुसरातिसरा कोणी नसून शाहरुखच असल्याची शंका अनेकांना आली. कारण ठरलं, PC नं मोठ्या कौतुकानं दाखवलेलं ते जॅकेट. 


बी- टाऊनमध्ये आजवर झालेल्या अनेक चर्चांचा आधार घेतल्यास, प्रियांका आणि शाहरुख यांच्यामध्ये Don 2 या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान जवळीक वाढली आणि त्यांच्या प्रेमप्रकरणाची सुरुवात झाली होती. इतकंच नव्हे, तर असंही म्हटलं जातं की, या नात्याची कुणकुण जेव्हा शाहरुखची पत्नी, गौरी खानला लागली तेव्हा तिनं प्रियांकासोबत कधीही काम न करण्याची अट शाहरुखपुढं ठेवली होती. 


Dirty Laundry नावाच्या एका टॉक शोदरम्यान प्रियांकानं तिच्याकडची एक मौल्यवान गोष्ट सर्वांपुढे आणली. ती गोष्ट म्हणजे काळ्या रंगाचं एक जॅकेट. सूत्रसंचालकाकडून ज्यावेळी प्रियांकाला या लेदर जॅकेटविषयी विचारण्यात आलं तेव्हा तिनं हे जॅकेट आपल्या एक्स बॉयफ्रेंडचं असल्याचं सांगत हे आपलं एअरपोर्ट जॅकेटही असल्याचं स्पष्ट केलं. 


आणि प्रियांका बोलतच राहिली... 


सूत्रसंचालकाकडून जॅकेटविषयी प्रश्न विचारताच प्रियांका त्याच्याविषयी बोलत राहिली ती राहिली. एकदा तेव्हाचा आपला प्रियकर आपल्या घरी राहिला होता आणि हे जॅकेट तिथंच विसरला आणि तेव्हापासून हे जॅकेट आपलं झालं असं प्रियांका म्हणाली. 


हेसुद्धा वाचा : घटस्फोटानंतर अर्जुन कपूरसोबत अफेअरच्या चर्चा; आता डेटिंग अ‍ॅपच्या भरवश्यावर कुशा कपिला!



'गोष्टींची अदलाबदली, देवाणघेवाण होतच राहते. पण, या गोष्टीवर माझा विशेष जीव आहे. कारण ही माझी गोष्ट आहे. आता ही गोष्ट त्याची नाही, कारण ती माझ्याच घरी राहिली आणि मी ती वापरण्यास सुरुवात केली. त्यानं ते परत मागितलं, पण मी काही ते दिलं नाही. कोणत्याही नात्यात हे असंच असतं...' असं प्रियांका या कार्यक्रमात म्हणताना दिसली. 



इथं प्रियांकानं जे D&G jacket जगासमोर आणलं तिथंच नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ जितक्यांचा व्हायरल झाला तितक्यांना शाहरुखचे काही फोटो शेअर केले. आश्चर्याची बाब म्हणजे शाहरुख त्या फोटोंमध्ये याच जॅकेटमध्ये दिसला. आता हा योगायोग म्हणावा की खरंच..... न सांगता अनेकांनाच खुप काही लक्षात आलं.