मुंबई : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा आणि अमेरिकन सिंगर निक जोनस यांचा साखरपुडा नुकताच पार पडला. मुंबई हिंदू परंपरेत रोका सेरेमनी झाल्यावर आता त्याचे फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यातच साखरपुड्यातील केकचा फोटो सोशल मीडियावर आकर्षणाचे केंद्र होत आहे. याचे कारण तुम्हाला माहित आहे का? तर मग जाणून घेऊया साखरपुड्यातील या केकबद्दल खास गोष्टी...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा केक Tiernom Patisserie चा शेफ Vahishta Zandbaf ने प्रियंका-निकच्या साखरपुड्यासाठी हा केक तयार केला होता. Tiernom Patisserie ने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर केकचे काही फोटोज आणि व्हिडिओज शेअर केले. त्यावर इंग्जेड असे लिहिले आहे.


हा केक १५ किलोचा असून ३ लोकांनी तो कॅरी केला होता. बटर क्रिमने हा केक तयार करण्यात आला होता. हा केक सजवण्यासाठी 24k गोल्ड पाने, बेरी आणि पिंक रंगाची cymbidium orchids आणि hydrangeas या फुलांचा वापर करण्यात आला होता. 



प्रियंका आणि निकच्या साखरपुड्यामुळे चाहते भलतेच खूश आहेत. पण त्याचबरोबर लग्नाची उत्सुकताही लागली आहे.