अभिनेत्री प्रियंका चोप्रा - निक जोनास या लवकरच साखरपुडा?
सध्या प्रियंका चोप्रा आपल्या खास मित्रासोबत मज्जा-मस्ती करताना दिसत आहे.
मुंबई : सध्या प्रियंका चोप्रा आपल्या खास मित्रासोबत मज्जा-मस्ती करताना दिसत आहे. तिचा हा मित्र तिच्यापेक्षा वयाने १० वर्षांनी लहान असून तो गायक आहे. मात्र, भारतात आलेला निक जोनास हा चर्चेचा विषय झालाय. कारणही तसेच आहे. प्रियंका आणि निक दोघेही हातात हात घालून फिरतानाचे फोटो व्हायरल होत आहे. सध्या प्रियंका ही निकसोबत गोव्यात एन्जॉय करतेय. त्यामुळे त्यांच्यातील नात्याबाबत जोरदार चर्चा आहे. बॉयफ्रेन्ड निक जोनससोबतच्या अफेअरमुळे चांगलीच चर्चेत आहे. 'फिल्मफेअर'च्या वृत्तानुसार, प्रियंका आणि निक हे जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात साखरपुडा करु शकतात.
अभिनेत्री म्हणून प्रियंकाचे नाव बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमध्ये आदराने घतले जाता आहे. एक अभिनेत्री म्हणून प्रियंकाचे करिअर सध्या चांगलंच सुरक्षित आहे. बॉलिवूडच्या आगामी 'भारत' या सिनेमात प्रियंका दिसणार आहे. त्याचबरोबर तिच्या निक मित्रासोबत ती आपल्या नात्याला पुढे घेऊन जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे निक भारतात येऊन प्रियंकाच्या कुटुंबीयांना भेटल्याचेही बोलले जात आहे.
२१ जून रोजी निक प्रियंकासोबत मुंबईत आला आहे. सध्या तो आणि प्रियंका गोव्यात मज्जा करत आहेत. प्रियंकाने या नात्याला केवळ मैत्रीचे नाव दिलेय. मात्र, दोघांमध्ये काहीतरी सुरु असल्याचं स्पष्ट दिसत आहे. दोघेही सोशल मीडियात एकमेकांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहेत.