VIDEO : प्रियांका-मोदीचं संभाषण सुरु असताना निकने असं काही केलं....
पाहा नेमकं काय घडलं
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक विशेष गोष्ट म्हणजे ते कोणत्याही कार्यक्रमात अगदी सहज उपस्थित राहतात. त्यांची ही सहजता सगळ्यांनाच आश्चर्य करणारी आहे. मंगळवारी रात्री असंच काहीसं झालं. जेव्हा प्रियंका चोप्रा आणि पंतप्रधान मोदी हिंदीत चर्चा करू लागले. तेव्हा...
असं काही झालं की प्रियंकाचा परदेशी पती निक जोनसची प्रतिक्रिया बदलली. प्रियंका - मोदी यांच हिंदीत संभाषण सुरू असताना त्यांच्या तोंडाकडे बघू लागला. सगळ्यांच्या भेटी घेतल्यानंतर मोदी आणि प्रियंका हिंदीत संभाषण करू लागली.
तेव्हा काही वेळा प्रियंकाकडे बघायचा तर कधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्याकडे. त्यांच्यातील संभाषण निकला कळत नव्हतं पण प्रियंकाला साथ देताना त्याच्या चेहऱ्यावर देखील हसू होतं.
पंतप्रधान मोदी यावेळी अगदी लाइट मूडमध्ये होते. प्रियंकाने आपल्या कुटुंबियांची आणि मोदींची ओळख करून दिली. प्रियंकाच्या सासूने देखील मोदींची भेट घेतली आणि भारतीय परंपरेनुसार अभिवादन केलं. मंगळवारी दिल्लीतील ताज हॉटेलमध्ये देसी गर्ल प्रियंका चोप्रा आणि निक जोनसचं रिसेप्शन होतं. यावेळी पंतप्रधान मोदी देखील उपस्थित होते. जोधपुरमध्ये लग्न केल्यानंतर हे लोकं दिल्लीत रवाना झाले.