मुंबई : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोपडाने बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास केला. ती नेहमी वेगवेगळ्या गोष्टीमुळे चर्चेत असते. ती आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.


प्रियकांचा खुलासा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रियंकाने एका इंटरव्यूमध्ये तिच्या लव्ह लाईफूबाबत खुलासा केला. एक वर्षाआधी ती रिलेशनशिपमध्ये असल्याचं तिने म्हटलं आहे. प्रियंकाने या इंटरव्यूमध्ये अनेक खुलासे केले आहेत. तिने म्हटलं की, मी आयुष्यात फक्त एकदाच लग्नावर विश्वास ठेवते. मागच्या वर्षापर्यंत मी एका सीरियस रिलेशनशिपमध्ये होती. पण मागील एका वर्षापासून मी सिंगल आहे आणि कोणालाही डेट नाही करत आहे.


प्रियंकाचं लग्नाबाबत मत


यासोबतच प्रियंकाने म्हटलं की, ती लोकांना भेटते. त्यांच्यासोबत पार्टी करते. पण असं कोणी नाही मिळालं जो मला इंम्प्रेस करु शकेल. मी सध्या कोणालाही डेट नाही करत आहे. मला सध्या सिंगल लाईफ जगायचं आहे. पण हा मला जर कोणी चांगला मुलगा मिळाला तर मी लग्न नक्की करेल.


कोणासोबत होतं अफेअर


आतापर्यंत अशा अनेक चर्चा रंगल्या की, प्रियंकाचं बॉलिवूडच्या एका सुपरस्टारसोबत अफेअर होतं. 2011 मध्ये तिचं अफेयर सुरु झालं. त्यावेळी प्रियंका शाहिदला डेट करत होती. एका इंटरव्यूमध्ये शाहिदने देखील म्हटलं होतं की, त्याला एका गर्लफ्रेंडने धोका दिला होता. शाहिदचा इशारा प्रियंकाकडेच होता. प्रियंकाने पण याबाबत कधी याबाबत चर्चा नाही केली.