Priyanka Chopra Success secret : अभिनेत्री प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra)  स्वतःच्या मेहनतीच्या बळावर बॉलिवूडमध्येच नाहीतर हॉलिवूडमध्ये देखील स्वतःचं स्थान पक्क केलं आहे. आज अनेक उभरत्या अभिनेत्रींच्या प्रेरणा स्थानी प्रियांका आहे. आज बॉलिवूडचे अनेक हीट सिनेमे प्रियांकाच्या नावावर आहेत. प्रियांका फक्त भारतातीलच नाहीतर, जगभरातील प्रसिद्ध व्यक्तीमत्वांपैकी एक आहे. पण एक वेळ अशी आली होती, जेव्हा अनेक लोकांना प्रियांकाचं यश पटत नव्हतं. (priyanka chopra speech)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका पॉडकास्टमध्ये प्रियांकाने तिचा विरोध करणाऱ्या लोकांबद्दल सांगितलं आहे. यशाच्या उच्च शिखरावर चढत असताना लागलेल्या ब्रेकवर अभिनेत्री म्हणाली, 'माझ्या करियरमध्ये काही अशी लोकं आली, ज्यांना कायम असं वाटायचं मी अयशस्वी व्हावं. मला काम मिळू नये म्हणून देखील त्यांनी अनेक प्रयत्न केले. पण मी कधीही माघार घेतली नाही...' (priyanka chopra motivational speech)


वाचा | लेकीच्या आधी आमिरचंच उरकणार? फातिमासोबतच्या 'त्या' क्षणांमुळे लग्नाच्या चर्चांना उधाण


 


पुढे प्रियांका म्हणाली, 'अनेकदा मला कामं देखील नाही मिळाली. (priyanka chopra success secret) आशा वेळी मी शांत बसली नाही. आशा लोकांकडे माझं लक्ष केंद्रित केलं जे माझ्यावर विश्वास ठेवत होते. अशा वेळी आपल्याला फक्त आपले प्रयत्न चालू ठेवावे...' असं देखील अभिनेत्री म्हणाली.  (priyanka chopra podcast)


यशस्वी होण्यासाठी Priyanka Chopra करायची दानवी पूजा? 


जगात आपल्या यशावर आनंदी होणारे फार कमी लोकं असतात. या पॉडकास्टमध्ये माहितीसाठी प्रियांका म्हणाली, 'यशस्वी होण्यासाठी मी कोणतीही दानवी पूजा केलेली नाही.' यशाबद्दल रंगलेल्या अफवांबद्दल देखील प्रियांकाने स्पष्टीकरण दिलं. 


प्रियांकाचे आगामा सिनेमे 
प्रियांका चोप्रा लवकरच (priyanka chopra movies) एव्हेंजर्सचे दिग्दर्शक रुसो ब्रदर्सच्या ‘सिटाडेल’ या वेब सीरिजच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. याशिवाय प्रियांका 'लव्ह अगेन', 'जी ले जरा' या सिनेमांमध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे.