Priyanka Chopra Viral Video : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा फक्त भारतीय अभिनेत्री नाही तर एक ग्लोबल स्टार आहे. प्रियांकाचे चाहते फक्त भारतात नाही तर परदेशात देखील आहेत. प्रियांकानं अमेरिकन सिंगर निक जोनसशी लगन केलं आहे. लग्न झाल्यापासून प्रियांका सतत पती निक जोनसच्या कॉन्सर्ट्सला हजेरी लावताना दिसते. नुकत्याच झालेल्या एका कॉन्सर्टमध्ये प्रियांका पतीला साथ देण्यासाठी पोहोचली होती. पण या दरम्यान, एका व्हिडीओत प्रियांकाला पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळते. तर एका व्हिडीओत प्रियांका रडत असल्याचे दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूयॉर्कच्या यांकी स्टेडियममध्ये काल शनिवारी जोनस ब्रदर्सचा एक कॉन्सर्ट होता. त्या कॉन्सर्टमध्ये पती आणि त्याच्या दोन्ही भावांना सपोर्ट करण्यासाठी प्रियांका तेथे पोहोचली होती. यावेळी स्टेडियममध्ये प्रियांकाला पाहताच तिच्याकडे पाहून लागले आणि तिचा व्हिडीओ शूट करण्यासाठी किंवा फोटो काढण्यासाठी पुढे येऊ लागले. प्रियांकाची फक्त एक झलक पाहण्यासाठी वेडे झालेल्या लोकांना सांभाळणं कठीण झालं होतं. तिथे उपस्थित असलेले सिक्यीरिटी गार्ड्स या सगळ्या चाहत्यांना लांब करत असताना. प्रियांका त्यांच्या पैकी एका गार्डला खूप आरामानं त्याच काम करण्यास सांगताना दिसते. सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओत प्रियांका व्हीआयपी स्टॅंडकडे जाताना दिसते. त्याचाच हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


दरम्यान, प्रियांकाचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात प्रियांका रडताना दिसत आहे. प्रियांका व्हीआयपी स्टॅंडमध्ये प्रियांका ही सोफी टर्नर आणि डेनियल जोनस यांच्यासोबत दिसत आहे. निक जोनसच्या कॉन्सर्टमधील त्याच पहिलं गाणं सुरु झाल्यानंतर प्रियांका इमोशन्ल झाल्याचे पाहायला मिळते. हा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चांगलाच चर्चेचा ठरला आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हेही वाचा : खुशी कपूर नव्हे, तर 'या' अभिनेत्रीला डेट करतोय AP Dhillon? लिपलॉकचा व्हिडीओ VIRAL


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


दरम्यान, प्रियांकाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती सगळ्यात शेवटी सिटाडेल या वेब सीरिजमध्ये दिसली होती. त्या आधी ती लव अगेनमध्ये दिसली. तर सध्या प्रियांका हेड्स ऑफ स्टेटच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात John Cena देखील दिसणार आहे. तर याशिवाय गेल्या काही दिवसांपासून प्रियांका ही 'जी ले जरा' या बॉलिवूड चित्रपटामुळे चर्चेत होती.पण चित्रपटाच्या लेखिका रीमा कागती यांनी चित्रपटात प्रियांका, आलिया भट्ट आणि कतरिना कैफ यांच्या महत्तावाच्या भूमिका असतील हे सांगितले.