मुंबई : 'गदर 2' सिनेमाचे दिग्दर्शक अनिल शर्माने प्रियांका चोप्राच्या करिअरवर मोठं वक्तव्य केलं आहे. प्रियांकाने त्याचा सिनेमा 'द हीरो: लव स्टोरी ऑफ ए स्पाई' काम केलं आहे. 2003 मध्ये रिलीज झालेला हा सिनेमा प्रियांकाा पहिला सिनेमा होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकताच अनिल शर्माने एका मुलाखतीत सांगितलं की, प्रियांका चित्रपटसृष्टी सोडण्याच्या मार्गावर होती कारण त्या काळात तिला अनेक चित्रपटांमधून काढून टाकण्यात आलं होतं. याचं कारण होतं प्रियांका चोप्राची प्लास्टिक सर्जरी. वास्तविक, हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी प्रियांकाने तिच्या नाकाची सर्जरी करून घेतली होती ज्यामुळे तिचं करिअर सुरू होण्यापूर्वीच संपुष्टात आलं असतं.


बॉलीवूड ठिकानाशी साधलेल्या संवादा दरम्यान अनिल शर्मा यांनी सांगितलं की, प्रियंकासोबत मोठी दुर्घटना घडली. ती छान दिसत होती, मी तिला चित्रपटात साइन केलं. माझ्या पत्नीने स्वतः तिला मंदिराबाहेर साईन अमाऊंन्ट दिली होती. त्यानंतर गदर चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मी अमेरिका आणि युरोपला गेलो. जेव्हा मी दोन महिन्यांनी परत आलो तेव्हा मला दिसलं की, प्रियांकाने तिच्या नाकाची शस्त्रक्रिया करून घेतली कारण तिला ज्युलिया रॉबर्ट्ससारखं दिसायचं होतं. हे मी एका वृत्तपत्रात वाचलं. माझ्या मनात विचार आला, प्रियांकाला असं करण्याची काय गरज होती, ती जशी होती तशीच ती सुंदर दिसत होती.


अनिल शर्मा पुढे म्हणाले, काही दिवसांनी एका निर्मात्याने मला प्रियांकाचा शस्त्रक्रियेनंतरचा फोटो दाखवला. मी तिला अजिबात ओळखू शकलो नाही आणि त्याला मी विचारलं, ही कोणती अभिनेत्री आहे? यावर तो म्हणाला, प्रियांका. मी हे ऐकून थक्क झालो. तिचा चेहरा पूर्णपणे काळा झाला होता, मला वाटलं हे प्रियांकाने स्वतःचं काय केलं आहे?


दुसऱ्या दिवशी मी प्रियांकाला भेटायला बोलावलं. ती आईसोबत मला भेटायला आली. प्रियांका आणि तिची आई रडत होती. प्रियांकाच्या नाकावर एक डाग पडलेला होता. यानंतर तिने मला सर्जरीबद्दल सांगितलं. ती खूण तिच्या नाकावर अजूनही आहे. प्रियांकाने सांगितलं की, तिला बरं होण्यासाठी काही महिने लागतील त्यामुळे तिला अनेक प्रोजेक्ट्समधून काढून टाकण्यात आलं आहे.


अनिल शर्मा म्हणाले, मी प्रियांकाला विचारले, तू असं का केलंस? यावंर प्रियांकाने सांगितलं की, ती सायनसच्या समस्येने त्रस्त होती जी तिच्यासाठी असह्य झाली होती. शस्त्रक्रिया चुकीची झाल्यामुळे प्रियंका इतकी नाराज झाली होती की तिने बरेलीला परत जाण्याचा निर्णय घेतला होता.


अनिल शर्मा यांनी प्रियांकाला पाठिंबा दिला
अनिल शर्माने प्रियांकाला कठीण काळात साथ दिली. यशराज फिल्म्समध्ये काम करणाऱ्या एका दिग्गज मेकअप आर्टिस्टला त्यांनी फोन केला. त्या मेकअप आर्टिस्टने माधुरी दीक्षित आणि श्रीदेवीसोबत काम केलं होतं. अनिल शर्मा म्हणाले, तो आल्यावर मी प्रियांकाची ओळख करून दिली आणि म्हणालो, दादा, ही मुलगी आहे, आम्ही तिला काय करू?


तो म्हणाला- मी काहीतरी करेन. तीन दिवसांनी आम्ही प्रियांकाची स्क्रीन टेस्ट घेतली. त्याला एक छोटा विग देण्यात आला. स्क्रीन टेस्ट झाल्यावर आम्ही ते सनी देओलसह अनेकांना दाखवलं. स्क्रीन टेस्ट पाहिल्यानंतर सर्वांनी प्रियांका खूपच सुंदर असल्याचं सांगितलं.


त्यानंतर मी प्रियंकासोबत 'द हिरो: स्टोरी ऑफ स्पाय' या चित्रपटाचं शूटिंग केलं. अनिल शर्मा यांनी प्रियांकाचं कौतुक करताना सांगितलं की, मी तिच्या प्रवासाचा खूप आदर करतो. अलीकडेच 'गदर 2'च्या यशानंतर प्रियांकाने अनिल शर्मा यांचं सोशल मीडियावर अभिनंदनही केलं होतं.