मुंबई : अमेरिकेच्या टीव्ही शो, क्वांटिको 3 यात व्यस्त असलेलय प्रियंका चोप्राचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात ती चक्क चालत्या गाडीतून खाली पडते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर सध्या  क्वांटिको 3 चे शूटिंग चालू आहे. त्यात प्रियंका सहकलाकार रोशेल टॉवे सोबत शूट करत आहे. त्याचदरम्यान एक व्हिडीओ शूट करण्यात आला. चालत्या गाडीत प्रियंका दरवाज्यावर उभी आहे आणि तिने गाडीला वर पकडले आहे. रोशल तिचा कोट पकडून आत खेचण्याचा प्रयत्न करत आहे. ती हात पाय मारत सावरण्याचा प्रयन्त करत आहे. मात्र तिचा तो प्रयत्न असफल होतो आणि ती गाडीतून खाली पडते.


प्रियंकाच्या टीमने हा व्हिडीओ शेअर केला आहे. मात्र हे खरे नसून ही गंमत आहे. ही सगळी कमाल स्क्रीनची आहे. गाडी चालत नाहीये.