मुंबई :  परिणीती चोपडा सध्या आपला चित्रपट 'सायना' बाबत चांगल्याच चर्चेत आहे. सायना चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून चांगलीच पसंती मिळत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतेच परिणीतीने म्हटले आहे की, 'बॅडमिंटन स्टार सायना नेहवालच्या रुपाने पडद्यावर उतरण्याआधी आपली मोठी बहीण प्रियंकाला फोन केला होता. आणि  प्रियंकाने या भूमिकेसाठी आपल्याला जीव ओतून काम करण्याचा सल्ला दिला'. 


प्रियंका ने नक्की काय म्हटले परिणीतीला?


या भूमिकेविषयी कळल्यानंतर परिणीतीने सर्वांत आधी प्रियंका चोपडाला  फोन केला. तेव्हा परिणीतीच्या दिसण्याबाबत प्रियंकाने सल्ला दिला. प्रियंका बॉक्सर मेरी कोमसारखी अजिबात वाटत नव्हती तरी त्या चित्रपटात तीने स्वतःमध्ये जबरजस्त ट्रान्सफॉर्म केले होते.


प्रियंकाने परिणीतीला असाही सल्ला दिला की, 'लुक बदलण्यासाठी प्रोस्थेटिक मेकअप वापरू नको'


प्रियंकाने आणखी सल्ला दिला की, 'या भूमिकेसाठी तुला फार काही करण्याची गरज नाही. परंतु बॉडी लाग्वेज (body language)वर काम करायची गरज आहे.'


परिणीतीने म्हटले आहे की, 'मला लहानपणापासून खेळायला आवडत नाही. पालकांनी मला अनेकदा वेगवेगळ्या खेळांमध्ये सहभागी करण्याचा प्रयत्न केला. परंतु तीचे मन अभ्यासात जास्त लागत असे'. 


चित्रपटाविषयी थोडे...


  • साइना हा चित्रपट आधी श्रद्धा कपूर करणार होती. 

  • साइना चित्रपट बॅडमिंटनपटू साइना नेहवालच्या जिवनावर आधारीत आहे.

  • या चित्रपटाचा ट्रेलर आंतरराष्ट्रीय महिलादिनी रिलिज झाला होता.

  • स्टोरी - हरियाणातील एका लहानशा गावातून आलेली मुलगी जगप्रसिद्ध बॅडमिंटनपटू बनते.

  • चित्रपटाचे लेखन अमोल गुप्ते यांनी केले आहे. 

  • चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार आहेत

  • 26 मार्च रोजी हा चित्रपट रिलिज होणार आहे.