मुंबई : बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्ये देखील आपल्या अभिनयाने ओळखी जाणारी लोकप्रिय अभिनेत्री प्रियंका चोप्रा अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. प्रियंका सोशल मीडियावर खूप ऍक्टिव असते. अनेकदा आपले फोटो पोस्ट करत असतात. प्रियंका फोटो पोस्ट करताना अनेकदा जोनससोबतचे फोटो शेअर करते. तसेच प्रियंका आपल्या स्टाइलमुळे चर्चेत असते. सध्या तिचा एक मजेदार किस्सा चर्चेत आला आहे. एका फ्लाइट अटेंडेंटने सांगितलेल्या किस्स्याची चर्चा रंगली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा किस्सा तेव्हाचा आहे जेव्हा प्रियंकाचं लग्न देखील झाले नव्हते. तेव्हा हॉलिवूडमध्ये प्रियंका आपली ओळख निर्माण करत होती. या दरम्यान अभिनेत्री अमेरिकन शो 'क्वॉन्टिको' मुळे खूप चर्चेत होती. तेव्हा ते अनेकदा भारत - अमेरिका विमान प्रवास करायची. हा किस्सा तेव्हाचा असून आता चर्चेत आला आहे. 



फ्लाइट अटेंडेंटने सांगितलं की,'प्रियंकाने त्यावेळी ब्लडी मेरी या ब्रँडच मद्य ऑर्डर केलं. प्रियंकाने या ड्रिंक्ससोबत हॉट सॉसेज देखील ऑर्डर केली. प्रियंकाने तीन पेग प्यायले आणि नशेत धुंद झाली. प्रियंका यानंतर लगेच झोपली. मात्र तिच्या त्यानंतरच्या वागणुकीमुळे इतर प्रवाशी हैराण झाले. ती एका लहान मुलीसारखी वागत होती.' 



या घटनेचा एक व्हिडिओ त्या अटेंडेंटने शेअर केला आहे. मात्र त्यानंतर तो व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.  महत्वाच म्हणजे प्रियंका वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आला आहे. मग ते बाफ्टाचा मंच असेल किंवा स्टाइल असू दे. तर कधी अनफिनिश्ड पुस्तकामुळे देखील प्रियंका चर्चेत आले. यासोबतच प्रियंकाने नवं रेस्टॉरंट 'सोना' मुळे देखील चर्चेत आले आहेत.