Priyanka Chopra ला फॅनकडून धक्काबुक्की; तरीही संयमानं केलं असं काही की... Video Viral
Priyanka Chopra Fan Pushed For Selfie: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती म्हणजे परिणिती चोप्रा आणि राघव चड्ढा (Parineeti Chopra and Raghav Chaddha) यांच्या साखरपुड्याची. दिल्लीत त्यांच्या साखरपुडा संपन्न होणार आहे. यावेळी आपल्या बहिणीच्या साखरपुड्यासाठी प्रियांका चोप्रानंही दिल्ली गाठली परंतु यावेळी तिला एअरपोर्टवर एका फॅननं धक्काबुक्की केली.
Priyanka Chopra Latest Video: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती म्हणजे परिणीती चोप्रा आणि आपचे खासदार राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याची. दिल्लीत आज 13 मे रोजी त्यांचा साखरपुडा संपन्न होणार आहे. तेव्हा त्याच्या साखरपुड्याला 150 पाहुणे उपस्थित राहणार आहे. परदेशात राहत असलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra Arrives in Delhi) आपल्या बहिणीच्या साखरपुड्यासाठी अमेरिकेवरून दिल्लीत आज दाखल झाली. दिल्ली एअरपोर्टवर ती स्पॉट झाली.
यावेळी तिचे एअरपोर्टवरचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. परंतु आपल्या लाडक्या बहिणीच्या साखरपुड्यासाठी आलेल्या प्रियांकाला मात्र एअरपोर्टवर वेगळ्याच प्रसंगाला तोंड द्यावे लागले. एअरपोर्टवरून परिणितीच्या घरी पोहचताना प्रियांकाला (Priyanka Chopra Latest Viral Video) एका फॅननं चक्क धक्काबुक्की केली.
सध्या याचा व्हिडीओ हा सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतो आहे. त्यामुळे परिणिती आणि राघव यांच्या साखरपुड्यांच्या (Priyanka Chopra at Parineeti Chopra Engagement Venue) चर्चांमध्ये आता प्रियांकाच्या या व्हिडीओची सध्या जोरदार चर्चा आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, प्रियांका एकटीच एअरपोर्टवर उतरली आहे. यावेळी तिच्यासोबत तिचा नवरा निक जोनासही नव्हता. ती एकटी आलेली होती. एअरपोर्टवर चालत असतानाच एक व्यक्ती येते आणि तिच्यामागून तिच्या पुढ्यात घुसते आणि आपला प्रियांकासोबत सेल्फी काढायचा प्रयत्न करते. हा माणूस अचानकच मध्ये येतो आणि सेल्फी काढायच्या नादात प्रियांकालाही धक्का देतो. परंतु प्रियांका मात्र संयमानं पुढे पुढे जातच राहते.
हेही वाचा - बिकीनी फोटोंनंतर आता Ileana D'Cruz च्या बेबी बंपमधील फोटोंची चर्चा, मिनिटांमध्ये फोटो व्हायरल
प्रियांकानं यावेळी मडी ब्राऊन कलरचा हुडी टी-शर्ट आणि पॅन्ट घातली होती. तिनं स्पोर्ट्स शुज आणि डोक्यावर कॅप व सनग्लासेस घातले (Priyanka Chopra Latest Airport Look) होते. तिच्या हातात एक लहानशी बॅग होती. तिच्यासोबत तिचे बॉडीगार्डही होती. यावेळी फॅननं धक्काबुक्की केल्यावर तिच्या बॉडीगार्ड्सनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला परंतु तरी तिथे उपस्थित असलेले तिचे फॅन्स हे तिचा सेल्फी काढू लागले होते.
मार्च महिन्यापासून राघव चड्ढा आणि परिणिती चोप्रा हे सातत्यानं स्पॉट होत आहेत. मध्यंततरी ते एका लंच पार्टीमध्ये एकत्र दिसले होते आणि त्यानंतर आयपीएलची (IPL Match) मॅच पाहण्यासाठीही ते एकत्र दिसले तसेच मध्यंतरी एका हॉटेलच्या बाहेरही ते दोघं स्पॉट झाले होते. त्यानंतर त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आले होते. गेल्या महिन्यापासून त्यांच्या साखरपुड्याच्याही चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे सर्वत्र त्यांच्या साखरपुड्याचीच चर्चा आहे. प्रियांका चोप्राही आता व्हेन्यूपर्यंत पोहचली आहे. यावर्षी प्रियांकाची 'सिटाडेल' (Citadel) ही वेबसिरिज प्रदर्शित झाली आहे ज्याची जगभरात चर्चा आहे.