मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा होती की, प्रियंका चोप्रा बॉलिवूडला 'बाय बाय' करणार? या चर्चेमुळे देसी गर्लचे चाहते प्रचंड नाराज झाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या साऱ्यांना माहितच आहे, प्रियंका गेल्या काही हॉलिवूडमध्ये बिझी आहे. "क्वांटिको" पाठोपाठच अनेक प्रोजेक्ट ती हॉलिवूडसोबत करत असल्याच्या अनेक बातम्या आल्या. त्यामुळे आता तिने बॉलिवूडला राम राम केलं आहे की काय? अशी चर्चा आहे. मात्र यावर खुद्द प्रियंकानेच चुप्पी तोडली आहे आणि चाहत्यांना दिलासा देणारी माहिती तिने सांगितली आहे. 


प्रियंकाला नुकतेच टोरँटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये शेअर हर जर्नी समारंभात गेस्ट ऑफ ऑनरने सन्मानित करण्यात आले. अशा पद्धतीचा सन्मान स्विकारणारी बॉलिवूडमधील पहिली अभिनेत्री आहे. यावेळी तिला मुलाखतीत देखील असाच सवाल विचारण्यात आला. त्यावेळी प्रियंकाने अगदी स्पष्ट शब्दात सांगितले की,  मी बॉलिवूड सोडून कुठेही जाणार नाही. केवळ ‘क्वांटिको’च्या एक्सटेंडेड प्रोजेक्टमुळे मी हिंदी चित्रपटांपासून दूर आहे. याचा अर्थ मी बॉलिवूड सोडले, असा होत नाही. 


पुढे बोलताना प्रियंकाने म्हटले की, पुढच्या वर्षी मी दोन बॉलिवूड सिनेमामध्ये काम करण्याचे निश्चित केले आहे. मात्र जोपर्यंत हे चित्रपट साइन करीत नाही, तोपर्यंत याविषयी काहीही सांगणे घाईचे ठरेल. यावेळी प्रियंकाने असेही म्हटले की, भारत आणि अमेरिका विसरून जा मी तर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्येही काम करण्यास उत्सुक आहे. आयएएनएसच्या रिपोर्टनुसार प्रियंकाने आणखी एक खुलासा केला आहे. त्यामध्ये म्हटले की, ‘एकवेळा मला असा सल्ला दिला गेला होता की, माझ्या पारंपरीक लूकमुळे मी चित्रपटांमध्ये काम करायला नको. मात्र तुम्हाला जर संधी मिळत असेल तर ती सोडायला नको, असा विचार मी करते.’ त्यामुळे आता चाहत्यांनी आता प्रियंकाच्या या वक्तव्यावर विश्वास ठेवून निश्चिंत राहावे.