मुंबई : बॉलिवू़डची देसी गर्ल प्रियंका चोप्राने आपला ठसा हॉलिवूडमध्येही उमटवला. मात्र अजून एका क्षेत्रात तिची कामगिरी वाखाण्याजोगी आहे. ती म्हणजे सामाजिक कार्य. तिच्या या कामगिरीसाठी तिला मदर तेरेसा मेमोरियल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  


चांगली कामगिरी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामाजिक कार्यात चांगली कामगिरी करणाऱ्यांना या पुरस्काराने सन्मानित केले जाते. अलीकडेच तिने सीरियाचा दौरा केला आणि तेथील पीडित मुलांना भेटून त्यांच्याशी संवाद साधला. त्याचबरोबर ती युनिसेफची ब्रँड अॅम्बेसिडर आहे. विविध सामाजिक कार्यात ती आवर्जून सहभागी होते. प्रियंकाची आई मधू चोप्रा यांनी प्रियंकाच्या वतीने या पुरस्काराचा स्विकार केला.


मधू चोप्रा म्हणाल्या की...


यावेळी त्या म्हणाल्या की, हा पुरस्कार मिळणे तर्कसंगत आहे आणि मला तिचा खूप अभिमान आहे. या पुरस्कारबद्दल मी आभारी आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की प्रियंका देखील नक्कीच खूप खूश होईल की तिचे प्रयत्न गरजवंतांच्या कामी आले. वंचिंतांना साहाय्य करण्यासाठी आणि गरिबांना मदत करण्यावर तिचा विश्वास आहे. 
यापुर्वी किरण बेदी, अण्णा हजारे, ऑस्कर फर्नांडिस, सुधा मूर्ति, मलाला यूसुफजई, सुष्मिता सेन आणि बिल्किस बानो एधी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.