प्रियांका चोप्राचा पती निक जोनास देतोय `या` गंभीर आजाराशी झुंज
नुकत्याच त्याने काही कॉन्सर्ट पुढे ढकलल्या आहेत आणि यामुळेच गायकाचे चाहत्यांची माफिही मागितली आहे. त्याने कामातून ब्रेक घेण्याचं कारण त्याला गंभीर आजाराने विळखा घातला आहे.
मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्राचा पती निक जोनास कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. नुकत्याच त्याने काही कॉन्सर्ट पुढे ढकलल्या आहेत आणि यामुळेच गायकाचे चाहत्यांची माफिही मागितली आहे. त्याने कामातून ब्रेक घेण्याचं कारण त्याला गंभीर आजाराने विळखा घातला आहे.
या आजाराशी झुंज देतोय निक जोनास
निक जोनासने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये गायक कॉन्सर्ट पुढे ढकलल्याबद्दल त्याच्या चाहत्यांची माफी मागत आहे. जोनास ब्रदर्सचा कॉन्सर्ट टूर पुढे ढकलण्याचं कारणही निक जोनासने व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. यावेळी गायकाने त्याच्या आजाराविषयी खुलासा केला आहे.
शेअर केलेल्या व्हिडीओत निक जोनासने सांगितलं की, ''मी निक मी तुमच्यासोबत अशी बातमी शेअर करणार आहे जी मजेदार नाही पण सांगणं महत्त्वाचं आहे. काही दिवसांपूर्वी, मला काहीतरी विचित्र वाटू लागलं, जेव्हा मी जागा झालो तेव्हा मला बोलता येत नव्हतं आणि त्या रात्री गाण्याची रिअर्सल करत होतो. गेल्या दोन-अडीच दिवसांत माझी प्रकृती हळूहळू खराब होत आहे. मी काल दिवसभर अंथरुणावर पडून होतो. ताप, अंगदुखी, घसा खवखवणे आणि खूप खोकला मला आहे.मला रिकव्हर होण्याची गरज आहे.
मला तुम्हांला निराश करायला आवडत नाही. तुम्ही आम्हाला पाठिंबा देण्यासाठी खूप काही करता. तुमच्यापैकी अनेकांनी या शोमध्ये सहभागी होण्यासाठी प्रवासही केला असेल. फक्त तुम्हाला सांगू इच्छितो की मी याबद्दल खूप दुःखी आहे, मला खरोखर खेद वाटतो पण मला यातून लवकर सावरण्याचा प्रयत्न करायचा आहे.
डॉक्टरांचे उपचार घेवूनही मला बरं वाटत नाहीये. शेअर केलेल्या या व्हिडिओला गायकाने असं कॅप्शन दिलं आहे, हाय मित्रांनो. मला 'इन्फ्लूएन्झा-ए'चा धोकादायक स्ट्रेन झाला आहे, जो सर्वत्र पसरत आहे. मी सध्या कोणत्याही कार्यक्रमात गाऊ शकत नाही. म्हणूनच मी मेक्सिको कॉन्सर्टची तारीख पुढे ढकलली आहे. आता हा शो ऑगस्टमध्ये होणार आहे. निक जोनासची लेटेस्ट पोस्ट चाहत्यांमध्ये प्रचंड व्हायरल होत आहे. गायकाची तब्येत लवकर बरी व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.
आता 21 आणि 22 ऑगस्टला त्याच्या गाण्याचा कार्यक्रम होणार आहे. निक जोनासच्या शोची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. या शोनंतर, जोनास ब्रदर्सचा पुढील शो आयर्लंडमध्ये आयोजित केला जाईल, त्यानंतर निक सप्टेंबरमध्ये यूके, ऑस्ट्रिया, जर्मनी, स्पेन, इटली आणि स्वित्झर्लंडमध्ये त्याचे भाऊ केविन आणि जो यांच्यासोबत परफॉर्म करेल. जोनास ब्रदर्सचा शेवटचा शो 16 ऑक्टोबर रोजी पोलंडमध्ये होणार आहे.