मुंबई : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. शुक्रवारी प्रियांका व्हाईट हाऊसमध्ये पोहोचली आणि तिथे अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिसची (Kamla Harris)  मुलाखत घेतली. डेमोक्रॅटिक नॅशनल कमिटीच्या वुमेन्स लीडरशिप फोरम अंतर्गत या मुलाखतीदरम्यान प्रियांकानं अमेरिकेतील वेतनाची समानता आणि बंदुकांवरील कायदा अशा अनेक विषयांवर उपराष्ट्रपतींना प्रश्न विचारले. या संवादादरम्यान प्रियांकानं खुलासा केला की, तिच्या 22 वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच तिला पुरुषांइतकीचं मानधन देखील मिळालं आहे. प्रियांकाचं हे वक्तव्य अशा वेळी समोर आले जेव्हा बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या मानधनाच्या तफावतीवर मोठी चर्चा सुरू आहे. पण या मुलाखतीदरम्यान आणखी एक मनोरंजक गोष्ट समोर आली आहे, ज्यानं लोकांची मने जिंकली. प्रियांका जेव्हा मुलाखत घेत होती तेव्हा निक जोनास तिथे उभा होता आणि मुलगी मालतीची काळजी घेत होता. सोशल मीडियावरही लोक याला महिला आणि पुरुषांच्या समान जबाबदारीशी जोडून पाहत आहेत.


आणखी वाचा : कॅमेऱ्यात कैद झाली कपिल शर्माची अशी चूक ज्यामुळे झाला ट्रोलिंगचा शिकार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रियांकानं या मुलाखतीच्या काही झलक इन्स्टाग्रामवर शेअर केल्या आहेत. यामध्ये ती पिवळ्या रंगाच्या बॅकलेस ड्रेस आणि मॅचिंग हील्समध्ये नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत आहे. दुसरीकडे, निक जोनसचे काही फोटोही व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये तो न्यूयॉर्कमध्ये मुलगी मालतीची काळजी घेत आहे. दोन फोटो शेअर करत त्यानं लिहिलं, ' वडील-मुलीचं न्यूयॉर्क सिटीमध्ये adventure .'


आणखी वाचा : संपत्ती असूनही 'या' अभिनेत्रींचा दुर्दैवी अंत, शेवटच्या क्षणीही होत्या एकट्या



आणखी वाचा : 'मला लघुशंका आली अन्...', प्रिया बापटचा 'तो' किस्सा ऐकल्यानंतर तुम्हीही व्हाल थक्क


उपाध्यक्ष कमला हॅरिस यांना दिलेल्या मुलाखतीत प्रियांकानं खुलासा केला की, तिच्या 22 वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच, या वर्षी तिला तिच्या पुरुष सहकलाकाराच्या बरोबरीने मानधन मिळालं आहे. प्रियांकानेही यापूर्वी भारतात वैवाहिक बलात्कार आणि गर्भपातावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले होते. सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण निर्णय देताना म्हटले की, कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीचं म्हणणं आहे की महिलेला तिचा गर्भपात करण्याचा अधिकार मिळायला हवा. या निर्णयावर इन्स्टाग्रामवर प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रियांका म्हणाली, 'निवडण्याचा अधिकार. जगभरातील महिलांसाठी हा एकमेव मार्ग असावा. एक प्रगतीशील पाऊल! (Priyanka Chopra Interviews Us Vice President Kamala Harris At White House While Nick Jonas Hangs Out With Daughter Malti Photos Viral) 


आणखी वाचा : धर्मेंद्र यांच्या घरी Hema Malini आणि मुलींना नव्हती एन्ट्री पण..., ईशा देओलनं अशी मोडली परंपरा


प्रियांका सध्या पती निक सोबत अमेरिकेत राहत आहे. प्रियांका अनेक हॉलिवूड प्रोजेक्टमध्ये दिसली आहे. यापुढे ती रुसो ब्रदर्सच्या बॅनरखाली तयार होत असलेल्या 'सिटाडेल' या मालिकेत दिसणार आहे. याशिवाय प्रियांकाकडे 'एंडिंग थिंग्ज' आणि 'इट्स ऑल कमिंग बॅक टू मी' सारखे चित्रपटही आहेत.


आणखी वाचा : हृतिक आणि सैफच्या यशात 'या' गोष्टीचा मोलाचा वाटा..., दोघांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा ...


प्रियांका बऱ्याच कालावधीनंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. फरहान अख्तरच्या 'जी ले जरा'मध्ये ती कतरिना कैफ आणि आलिया भट्टसोबत दिसणार आहे. मात्र, कतरिना आणि आलियाचं लग्न आणि नंतर आलियाची गर्भधारणा यामुळे या चित्रपटाचे काम अद्याप सुरू झालेले नाही.