कॅमेऱ्यात कैद झाली कपिल शर्माची अशी चूक ज्यामुळे झाला ट्रोलिंगचा शिकार

कपिलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Updated: Oct 1, 2022, 04:56 PM IST
कॅमेऱ्यात कैद झाली कपिल शर्माची अशी चूक ज्यामुळे झाला ट्रोलिंगचा शिकार

मुंबई : कॉमेडी किंग कपिल शर्मा (Kapil Sharma) त्याच्या विनोदी कॉमेडीमुळे जगभर ओळखला जातो. कपिलनं त्याच्या वन लाइनर्ससह प्रँकनं सगळ्यांना हसवलं, तर आता कपिल स्वतः एका प्रँकचा बळी झाल्याचं दिसत आहे. कपिल शर्मानं त्याच्या दुबई ट्रिपचा एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कपिल शर्मा त्याच्या मित्रांसोबत दुबईतील एका तुर्की रेस्टॉरंटमध्ये दिसत आहे आणि यादरम्यान रेस्टॉरंटचा वेटर येतो आणि असं काही करतो की कपिल घाबरतो. कपिलनं स्वतःचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. मात्र, यादरम्यान कपिलनं असं काही केलं की, जे चाहत्यांच्या नजरेत खिळलं आहे. (Kapil Sharma Viral Video)

आणखी वाचा : संपत्ती असूनही 'या' अभिनेत्रींचा दुर्दैवी अंत, शेवटच्या क्षणीही होत्या एकट्या

कपिल दुबईच्या आलिशान रेस्टॉरंट CZN Burak मध्ये बसलेला दिसत आहे आणि त्याच्या समोरच्या टेबलवर विविध पदार्थ दिसत आहेत. कपिल टेबलवर जेवणाची वाट पाहत आहे आणि इतक्यात वेटर हातात ताट घेऊन पोहोचला. कपिलच्या जवळ येताच तो मुद्दाम जेवणाचं ताट हलवतो, जे पाहून कॉमेडियन घाबरून जातो. (kapil sharma prank at dubai hotel kapil sharma scared of prank in hotel )

आणखी वाचा : 'मला लघुशंका आली अन्...', प्रिया बापटचा 'तो' किस्सा ऐकल्यानंतर तुम्हीही व्हाल थक्क

व्हिडिओ शेअर करताना कपिल शर्मानं कॅप्शनमध्ये लिहिले, अरेरे. अनेकदा लोकांची खिल्ली उडवणाऱ्या किंवा मस्करी करणऱ्या कपिलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आता लोकांच्या नजरा या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत असलेल्या गोष्टींकडे कमी आहेत, पण कपिलनं काय लपवण्याचा प्रयत्न केला आहे याकडेच जास्त लक्ष लागले आहे. खरं तर, हा व्हिडिओ शूट सुरू होताच कपिलनं लगेचच त्याच्या समोर ठेवलेल्या काही गोष्टी टेबलवर लपवतो आणि काढून टाकतो. कपिलनं सिगारेटचा बॉक्स लपवल्याचे सोशल मीडिया यूजर्सचे म्हणणे आहे.

आणखी वाचा : धर्मेंद्र यांच्या घरी Hema Malini आणि मुलींना नव्हती एन्ट्री पण..., ईशा देओलनं अशी मोडली परंपरा

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा : हृतिक आणि सैफच्या यशात 'या' गोष्टीचा मोलाचा वाटा..., दोघांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा ...

या व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, 'अरे देवा, मी सरांच्या हातात सिगारेट पाहिली, सर्वांनी पाहिली का?' दुसरा नेटकरी म्हणाला, 'नवरात्रीत सिगारेट, चिकन, मटण... बॉलीवूडची हवा लागलीये?' तिसरा नेटकरी म्हणाला, 'त्यानं काय लपवलं ते देखील पाहिले.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'सर, तुम्ही काय लपवल आहे त्याचा ब्रँड मला सांगा, आज होगा पोस्ट का पोस्टमॉर्टम.'