प्रियंकाची ब्रिटीश फॅशन काउंसिलची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड
मिस वर्ड ठरलेल्या प्रियंकाने २००३ साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
मुंबई : जगातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेल्या बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा जोनसने (Priyanka Chopra Jonas)कलाविश्वात २० वर्ष पूर्ण केली आहेत. आपल्या अभिनय आणि सौंदर्य शैलीने लोकांची मने जिंकणार्या प्रियंकाची ब्रिटीश फॅशन काउंसिल (बीएफसी) ची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड झाली आहे. त्यामुळे तिचा प्रवास आता फॅशनच्या जगाकडे जास्त असणार आहे. ब्रँड अॅम्बेसेडर झाल्यानंतर तिने ट्विट करून माहिती दिली.
ट्विट करत ती म्हणाली, 'लंडनमध्ये वास्तव्य करून काम करत असताना मला ब्रिटीश कौन्सिल फॉर पॉझिटिव्ह चेंजचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे पुढील काळात काही खास करण्यासाठी उत्साही उपक्रम असतील आणि या प्रवासात मी तुम्हाला देखील सहभागी करून घेणार आहे.' असं ट्विट तिने केलं आहे.
मिस वर्ड ठरलेल्या प्रियंकाने २००३ साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं त्यानंतर तिने आपला अभिनयाचा प्रवास असाच सुरू ठेवला. यशाकडे वाटचाल करणाऱ्या प्रियंकाने मागे वळून पाहिले नाही. 'हीरोः द स्टोरी ऑफ ए स्पाई' या चित्रपटाच्या माध्यमातून ती मोठ्या पडद्यावर झळकली. तिने तिचा प्रवास फक्त बॉलिवूडपर्यंत मर्यादित ठेवला नाही, तर पुढे हॉलिवूडमध्ये देखील तिने स्वतःचं नाव मोठं केलं आहे.