मुंबई : प्रियांका चोप्रा लवकरच हॉलीवूड चित्रपट 'अ किड लाईक अ जेक'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचं प्रमोशन प्रियांका चोप्रा जोरात करत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'अ किड लाईक अ जेक' चित्रपटाच्या प्री-स्क्रिनिंगआधी पार्टी झाली. या पार्टीमध्ये प्रियांका वेगळ्याच अवतारामध्ये पाहायला मिळाली.


प्रियांका चोप्रा कोणत्याही आंतरराष्ट्रीय कार्यक्रमामध्ये स्टायलीश अंदाजात दिसते. पण या चित्रपटाच्या प्री-स्क्रिनिंग पार्टीतला प्रियांकाचा लूक वेगळाच होता.


प्रियांका या कार्यक्रमाला काळा स्वेटर घालून आली होती. या काळ्या स्वेटरवर लाल आणि पिवळे पॅच होते. प्रियांकाचे हे कपडे सोशल नेटवर्किंगवरच्या यूजर्सना फारसे पसंद पडले नसल्याचंच दिसून आलं. हा प्रियांका चोप्राचा दुसरा हॉलीवूड चित्रपट आहे. याआधी प्रियांका बेवॉच या चित्रपटात दिसली होती.